Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत रोज चढ-उतार होत आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात 459 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर पाच कोरोना रूग्णांचा मृत्यू झालाय. दिलासादायक बाब म्हणजे आज नव्या रूग्णांपेक्षा कोरोनातून बऱ्या झालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. आज 538 जण कोरोनातून बरे होऊन घरी परते आहेत. 


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात 538 रूग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्या  79,69,878 वर पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होण्याचा (Recovery Rate) दर 98.13 टक्के झाला आहे. 


पाच बाधितांचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. राज्यास सध्या मृत्यू दर हा 1.82 टक्के आहे. 


 सक्रिय रूग्ण (Maharashtra Corona Update) 
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या 3192 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहे. यात पुण्यात सर्वात जास्त म्हणजे 1179 सक्रिय रूग्ण आहेत. त्यापाठोपाठ मुंबईत 697 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. तर मुंबईनंतर ठाण्यात 340 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत.  गेल्या काही दिवसांमध्ये सक्रिय रूग्णांच्या संख्येत घट होत आहे. 


देशातील स्थिती (India Corona Update) 
देशातील कोरोना रूग्णांच्या (India Corona Updates) संख्येत घट होत आहे. देशात काल  3 हजार 615 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी देशात कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 230 इतकी होती. जून महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोबाधितांची संख्या तीन हजारांपर्यंत खाली घसरली आहे. देशात कोरोनाच्या आलेखामध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत असली तरी अद्याप कोरोना पूर्ण पणे संपलेला नाही. रोज नव्या रूग्णांची नोंद होत आहे त्याचप्रमाणे कोरोनाने मृत्यू होणे देखील अजून सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे महत्वाचे आहे. 


दरम्यान, कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसतानाच आता एका अहवालात संशोधकांनी कोरोनासारख्या आणखी एका घातक व्हायरसबाबत इशारा दिला आहे. संशोधकांना रशियन वटवाघळांमध्ये खोस्ता-2 नावाचा नवा विषाणू आढळून आला आहे. जो SARS-CoV-2 व्हायरससारखाच आहे. प्राथमिक संशोधनाच्या आधारे, शास्त्रज्ञांना असं आढळलं की, हा व्हायरस मानवी पेशींमध्ये सहजपणे प्रवेश करू शकतो आणि संसर्गाचा धोका वाढवू शकतो.  


महत्वाच्या बातम्या


Khosta-2 Virus : कोरोनानंतर नव्या व्हायरसनं जगाची धाकधूक वाढवली, ना लस प्रभावी, ना औषधं; कसा पसरतो 'खोस्ता