मुंबई : राज्यातील कोरोना (Corona) रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. काही महिन्यात अत्यंत कमी झालेली रुग्णसंख्या आता वाढू लागू लागल्याने चिंताही वाढू लागली आहे. शुक्रवारी राज्यात 343 रुग्ण आढळून आले आहेत.  तर  दिवसभरात राज्यात कोरोनाच्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यासाठी ही चिंतेची बाब  आहे.


सक्रिय रुग्णसंख्या वाढली  (Maharashtra Active Cases) 


राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 1763 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 8,65,71,673 इतक्या प्रयोगशाळा तपासण्या झाल्या आहेत. त्यापैकी 9.40 टक्के नमुने हे पॉझिटिव्ह सापडले आहेत. 


पुणेकरांची चिंता वाढली (Pune Corona Update)


शुक्रवारी राज्यात 343 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 194 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरातील असून पुण्यात 510 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ मुंबई, ठाण्याचा क्रमांक आहे.   राज्यात  कोरोनाच्या तीन मृत्यूची नोंद झाली आहे


तीन कोरोना मृत्यूची नोंद (Corona Death) 


राज्यात  एकूण 194 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 79,90, 824  जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.16 टक्के इतकं झालं आहे. राज्यात तीन कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णाांची एकूण संख्या 81,41, 020इतकी झाली आहे.


कोरोना संसर्ग झाल्यास 'ही' औषधं टाळा


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा वाढता धोका पाहता कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सध्या भारतात कोरोनाच्या प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी 'लोपीनाविर-रिटोनावीर', 'हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन', 'आयव्हरमेक्टिन', 'मोलनुपिराविर', 'फॅविपिरावीर', 'अझिथ्रोमायसिन' आणि 'डॉक्सीसायक्लिन' यासारखी औषधे वापरली जाऊ नयेत, असं सांगण्यात आलं आहे.


 राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन 


पुण्यासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे केंद्र सरकारही सतर्क झाले आहे.  कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोर्डवर आहे. राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.  


कोरोनासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्वे जारी


आरोग्य मंत्रालयाच्या नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे की, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला 5 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. गंभीर लक्षणे किंवा उच्च ताप असलेल्या रुग्णांच्या बाबतीत पाच दिवसांसाठी रेमडेसिव्हिर औषधं घेतलं जाऊ शकतं पण, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावं.


संबंधित बातम्या :


Corona Guidelines : पुन्हा कोरोनाचा वाढता धोका, आरोग्य मंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी, 'या' गोष्टींची काळजी घ्या