मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. आज राज्यामध्ये 307 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 240 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गुरूवारी राज्यामध्ये 311 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
आज एकही मृत्यू नाही
राज्यात आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 78,82,476 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे.
राज्यात 1828 सक्रिय रुग्णांची नोंद
राज्यात आज एकूण 1828 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 1211 रुग्ण हे मुंबईमध्ये आढळतात. तर त्या खालोखाल पुण्यामध्ये, 306 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
गेल्या 24 तासांत 2323 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
भारतात पुन्हा एकदा दोन हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 2323 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 25 बाधितांनी आपला जीव गमावला आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे गेल्या 24 तासांत 2346 रूग्ण कोरोनापासून बरेही झाले आहेत. कोरोनाचे सक्रिय रुग्ण 15 हजारांहून कमी झाले आहेत. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण चार कोटी 31 लाख 34 हजार 145 जणांना लागण झाली आहे. त्यापैकी 5 लाख 24 हजार 348 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 94 हजार लोक बरे झाले आहेत. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 14996 आहे. म्हणजेच अजूनही अनेक जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
संबंधित बातम्या