मुंबई : राज्यात जून  महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे.  सोमवारी राज्यात 1885  रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील 1118 रुग्ण हे मुंबईतील आहे आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब  आहे.


मुंबईकरांची चिंता वाढली


आज राज्यात 1885 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 774  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 1118  रुग्णांची नोंद झाली आहे.  राज्यात आज कोरोनाच्या एका  मृत्यूची नोंद झाली आहे. 


आज एका कोरोना मृत्यूची नोंद


राज्यात आज एकूण 774  रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77,47, 111  जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.91 टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका झाला आहे. 


सक्रिय रुग्णसंख्या वाढली


राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 17480 सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 11331 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये 3233 इतके सक्रिय रुग्ण आहेत. 


राज्यात बी. ए. 4 चे तीन आणि बी. ए. 5 व्हेरियंटचा एक रुग्ण


मुंबईत बी. ए. 4 चे तीन आणि बी. ए. 5 व्हेरियंटचा एक रुग्ण आढळला आहे. हे सर्व रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले आहेत. 


गेल्या 24 तासांत 8084 नवीन कोरोना रुग्णांची वाढ


 गेल्या 24 तासांत 8084 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी 8582 कोरोना रुग्णांची नोंद आणि चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशात एकूण 5 लाख 24 हजार 771 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.