मुंबई : राज्यात आज 1812 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update)  नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1675  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात बीए. 5 व्हेरीयंटचे तीन  रुग्ण तर बीए. 2.75  चे 16 रुग्ण आढळले आहेत. 


राज्यात बीए. 5 व्हेरीयंटचे तीन  रुग्ण तर बीए. 2.75  चे 16 रुग्ण 


राज्यात बीए. 5 व्हेरीयंटचे तीन रुग्ण तर बीए. 2.75  चे 16 रुग्ण आढळले आहे.  यामुळे बीए. 5 व्हेरीयंटची रुग्णसंख्या 275 आणि बीए. 2.75 ची रुग्णसंख्या 250 वर गेली आहे. 


एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 


राज्यात आज एका  कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,99,582 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.01 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात एकूण 12011 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 


राज्यात एकूण 12011 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 2924  इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईमध्ये 2734   सक्रिय रुग्ण आहेत. 


देशात 18 हजार 738 नवीन कोरोनाबाधित, 40 रुग्णांचा मृत्यू (Covid 19 in India)


देशात कोरोना संसर्गातील वाढ कायम आहे. देशात कोरोनाबाधितांसह मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 18 हजार 738 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात शुक्रवारी दिवसभरात 19 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू झाला. याच्या तुलनेत शनिवारी दिवसभरात आढळलेल्या रुग्णांची संख्या किंचित कमी झाली असली, तरी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचं प्रमाण वाढलं आहे. ध्या भारतात 1 लाख 34 हजार 933 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशात 18 हजार 558 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 34 लाख 84 हजार 110 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.31 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.50 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 19 हजार 928 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 5.02 टक्के आहे.