मुंबई : महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे. राज्यात आज दिवसभरात 15 हजार 817 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज 11 हजार 344 जण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईतही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताच आहे. शहरात आज 1 हजार 646 रुग्ण आढळले आहेत. 

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 22 लाख 82 हजार 191 वर पोहोचली आहे. तर सध्या 1 लाख 10 हजार 485 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 21 लाख 17 हजार 744 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. रुग्ण बरं होण्याचा दर 92.79 टक्के आहे. राज्यातील मृतांचा आकडा 52 हजार 723 वर पोहोचला आहे. मृत्यूदर 2.31 टक्के आहे. 

सध्या 5 लाख 42 हजार 693 जण होम क्वॉरन्टीन असून 4 हजार 884 जण इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टीन आहेत. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या 1 कोटी 73 लाख 10 हजार 586 पैकी 22 लाख 82 हजार 191 रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत.

राज्यातील मागील पाच दिवसांतील कोरोनाबाधित रुग्ण8 मार्च - 8 हजार 7449 मार्च - 9 हजार 92710 मार्च - 13 हजार 65911 मार्च - 14 हजार 31712 मार्च - 15 हजार 817