पंढरपूर : कोरोनाचे संकटामुळे गेले संपूर्ण वर्ष वारकरी संप्रदायासाठी काळे वर्ष ठरले होते. गेल्या वर्षी चैत्री, सर्वात मोठी असलेली आषाढी यात्रा त्यानंतर 3 वर्षातून येणार अधिक मास आणि कार्तिकी यात्रा हे सर्व सोहळे कोरोनामुळे रद्द झाले होते. वाईट आठवणींचे 2020 साल संपले आणि नवीन 2021 सालात वारकरी संप्रदायाची येणारी पहिली यात्रा पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडली आहे. एका बाजूला कोरोनावरील लसीकरणाला देशभर सुरुवात झाली असताना अजूनही कोरोनाचे संकट संपले नसल्याने राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यातही लॉकडाऊन घोषित केला आहे.


वारकरी संप्रदायाची माघी यात्रा 23 फेब्रुवारी रोजी होत असून कोरोनाच्या नियमानुसार कोणत्याही यात्रा जत्रा भरण्यास परवानगी नसल्याने या यात्रेवरही अनिश्चिचिततेचे सावट आहे. याबाबत मंदिर समितीची 2 फेब्रुवारी रोजी बैठक होत असली तरी शासनाच्या निर्देशानुसारच मंदिर समितीलाही यात्रेबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.


सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी यात्रा रद्द, गडावरील मंदिर सजलं, मंदिर परिसरात येण्यास भाविकांना मज्जाव


अशावेळी नवीन वर्षातील ही पहिली यात्रा व्हावी अशी वारकरी संप्रदाय मागणी करीत असून वारकर्यांनी वर्षभर अपूर्ण राहिलेली भक्तीची भूक या माघी यात्रेपासून भागवण्यास उद्धव ठाकरे सरकारने सुरुवात करावी अशी अपेक्षा वारकरी , फडकरी दिंडी समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांना वाटते आहे.


सोलापूरमधील सिद्धेश्वर यात्रेपाठोपाठ नांदेड जिल्ह्यातील माळेगावची यात्रा कोरोनामुळे रद्द


मात्र कोरोनाच्या संकटामुळे नवीन वर्षातील राज्यात होणाऱ्या अनेक यात्रा शासनाने रद्द केल्याने माघीबाबतही शासनाच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी सांगत आहेत . सध्याच्या कोरोना संकट काळात अजून लसीकरण सर्वसामान्यांना देण्यास सुरुवात झाली नसल्याने वारकरी संप्रदायाची माघी यात्राही संचारबंदीमध्येच साजरी होण्याची शक्यता जास्त आहे.


यंदा खंडोबाच्या सोन्याच्या जेजुरीत शुकशकाट; कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द