मुंबई : कोरोनाबाधितांच्या  (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज  695 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 631  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 90  हजार 936 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे. 


राज्यात आज सात नव्या 7 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद


राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे.  राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज नव्या 7 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे.  यात मुंबईचे तीन तर, पिंपरी चिंचवड येथील चार रुग्ण आहेत. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या आता 17 झाली आहे. 


राज्यात आज 12 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


 राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 534 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 75 हजार 290 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 870  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 66 , 39, 988 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


मुंबईत आज 192 रुग्णांची भर तर एकाचा मृत्यू


गेल्या 24 तासात मुंबईत 192 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 183 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 1773 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,44, 449 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 2603 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.03 टक्के इतका झाला आहे. 


देशात आज 24 तासांत 8 हजार 503 दैनंदिन कोरोना रुग्ण


 देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसचे 8 हजार 503 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 624 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे एकूण 23 रुग्ण समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 94 हजार 943 आहे. अशातच या महामारीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढून 4 लाख 74 हजार झाली आहे. आकडेवारीनुसार, काल (गुरुवारी) 7678 कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 5 हजार 66 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


पुन्हा निर्बंध, बुस्टर डोस आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...



संबंधित बातम्या :