मुंबई :  राज्यात आज 2229 कोरोनाच्या (Corona) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2594 रुग्ण कोरोनामुक्त  होऊन घरी परतले आहेत. मुंबईत सध्या  3318 सक्रिय रुग्ण (Active Patient) आहेत. 


राज्यात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू


राज्यात आज चाक कोरोनाबाधित (Corona Death)  रुग्णांनी आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78, 47, 894 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.95 टक्के इतकं झालं आहे.  


राज्यात आज एकूण 16553  सक्रिय रुग्ण


राज्यात आज एकूण 16553 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 2805  इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यात 1559 सक्रिय रुग्ण आहेत.


देशात 20 हजार 139 नवे कोरोनाबाधित, 38 रुग्णांचा मृत्यू रुग्ण


गेल्या 24 तासांत 20 हजार 139 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी देशात 16 हजार 906 रुग्णांची नोंद आणि 45 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तुलनेत मृत्यूंची संख्या घटली असली तरी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही नवीन आकडेवारी जारी केली आहे. देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 482 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी दिवसभरात 38 जणांचा मृत्यू झाला. यासह कोरोनामुळे एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 5 लाख 25 हजार 557 वर पोहोचली आहे. सध्या भारतात कोरोनाचे 1 लाख 36 हजार 76 सक्रिय रुग्ण आहेत. सध्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.31 टक्के आहे.  तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.49 टक्के आहे. नव्या 16 हजार 482 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. यामुळे आतापर्यंत देशात एकूण 4 कोटी 30 लाख 28 हजार 356 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.