Mumbai School :  देशभरासह महाराष्ट्रातही कोरोना (Coronavirus) रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यातच मुंबईतील (Mumbai) कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू राहणार आहे. हा निर्णय फक्त मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांसाठी आहे.


 पहिली ते आठवीसह नववी आणि अकरावीच्या वर्ग सुद्धा बंद राहणार आहे.  या विद्यार्थ्यांना देखील  ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे. फक्त दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा विचार करता दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा सुरू राहणार आहे. उद्यापासून ते 31 जानेवारीपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 


मुंबईतील शाळा सुरू आणि बंद होण्याचा क्रम


14 मार्च 2020 ला मुंबईतील आणि राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट कमी झाल्यानंतर मुंबईतील आठवी ते बारावीच्या शाळा या 4 ऑक्टोंबर 2021 पासून सुरू करण्यात आल्या. त्यानंतर 15 डिसेंबर 2021 पासून मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहे.  4 जानेवारी 2022 पासून पुन्हा एकदा कोरणा रुग्णसंख्या वाढतांना पाहता पहिली ते आठवीच्या शिवाय नववी आणि अकरावीच्या शाळा 31 जानेवारी 2022 पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री यांनी सर्व संबंधितांची तातडीच्या बैठकीचे  आयोजिन करण्यात आले  होते.  तसेच प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाची काय परिस्थिती आहे. त्यानुसार शाळा संदर्भात काय निर्णय घ्यायचा यावर चर्चा करण्यात आली होती. 


मुंबईमधील पहिली ते सातवीच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्यात आल्या आहेत.  मुंबईमधील बहुतेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद केलं आहे.  मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढ होऊ लागलीय. याचपार्श्वभूमीवर नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आलीय. मुंबईत काल  8 हजार 63 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 


BMC कडून सर्व तयारी पूर्ण


सध्या मुंबईत रोज आठ हजार कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. आजही तेवढेच रूग्ण सापडण्याची शक्यता आहे. करोनाचे रूग्ण वाढले तरी त्याविरोधाक लढण्यासाठी BMC ची पूर्ण तयारी झाली आहे. 30 हजारांपेक्षा जास्त खाटा सध्या उपलब्ध आहेत. त्याबरोबरच औषधे आणि वेंटीलेटरही उपलब्ध आहेत, असे कांकणी यांनी सांगितले. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha