मुंबई :  राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. काही दिवसांपासून रोज 9 हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. आज  7, 603 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 15 हजार 277 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.  राज्यात आतापर्यंत 59 लाख 27 हजार 756 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.15 टक्के आहे. 


राज्यात आज 53 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 48 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 8 हजार 343 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (71), हिंगोली (75), यवतमाळ (22), गोंदिया (63)  या चार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16, 925 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


परभणी, यवतमाळ, भंडारा जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापुरात सर्वाधिक 1640 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,41,86,449 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,65, 402 (13.95 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,82,476 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,654 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 701 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे.   मुंबईत गेल्या 24 तासात 478 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 701 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,03,077 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 7,120 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 926 दिवसांवर गेला आहे. 


 देशात काल 37 हजार 154 नवे कोरोनाबाधित


 देशात काल  24 तासांत 37 हजार 154 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अशातच काल (रविवारी) 39 हजार 649 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, 724 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात रिकव्हरी रेट वाढून आता 97.22 टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत एकूण 43 कोटी 23 लाख 17 हजार सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार (ICMR), भारतात कोरोनाचे 14 लाख 32 हजार 343 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्यानंतर आतापर्यंत एकूण 43 कोटी 23 लाख 17 हजार 813 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत.  तासांत 37 हजार 154 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.