मुंबई : राज्यात आज 836 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update)  नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1224 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 


राज्यात आज दोन कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,14,433 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.02 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात एकूण 11,758 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 


राज्यात एकूण 11758 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये  मुंबईत सर्वाधिक म्हणजे 5071  इतके रुग्ण असून त्यानंतर पुण्यामध्ये 1914   सक्रिय रुग्ण आहेत. 


देशात 8 हजार 813 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus Cases Today in India)


देशात सोमवारी दिवसभरात 8 हजार 813 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 63 दिवसांनंतर देशात सर्वात कमी कोरोनाबाधित आढळले आहेत. आधीच्या दिवसाच्या तुलनेत नवीन कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. देशात रविवारी दिवसभरात 14 हजार 917 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी आकडेवारी जारी केली आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही घटली आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. देशात सध्या 1 लाख 11 हजार 252 एकूण कोरोनाबाधित असून त्यांच्या उपचार सुरु आहेत. भारतात सध्या 15,040 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. देशात एकूण 4 कोटी 36 लाख 38 हजार 844 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.