मुंबई : राज्यात आज 1183 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1098  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 


राज्यात एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,25, 645 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.02 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात एकूण 11,725 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 


राज्यात एकूण 11725 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये  मुंबईत सर्वाधिक म्हणजे 5769  इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 2040   सक्रिय रुग्ण आहेत. 


देशात 9531 नवे कोरोना रुग्ण (Coronavirus Cases Today)


देशातील कोरोनाचा आलेख घटताना दिसत आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आठवड्याच्या शेवटी कमी होताना पाहायला मिळला. त्यानंतर आता सोमवारी या आठवड्याच्या सुरुवातीलाही कोरोनाचा आलेख घटताच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात रविवारी दिवसभरात 9531 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी ही संख्या 11,539 इतकी होती. यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत 2008 रुग्णांची घट झाली असल्याने ही एक चांगली बातमी आहे. दरम्यान गेल्या 24 तासांत देशात 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.