Maharashtra Corona Cases : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून दहा हजारांच्या खाली आला आहे. आज 8 हजार 470 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 9 हजार 046 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,42,258 इतकी झालीय. आज 188 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 1.98 टक्के एवढा आहे.


राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.9 टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 188 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.98 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,98,86,554 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,87,521 (15.01टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,58,863 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,196 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात  काल रोजी एकूण 1,23,340 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


Delta Plus : डेल्टा प्लस व्हेरिएंट 'चिंताजनक' घोषित, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळला केंद्र सरकारचा अलर्ट


सोमवारच्या तुलनेत मंगळवारी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ


दरम्यान सोमवारच्या आकडेवारीचा विचार करता नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत 2 हजार 200 ने वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सोमवारी 13,758 तर मंगळवारी 9,046  कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. म्हणजेच सोमवारच्या तुलनेत काल मंगळवारी रुग्ण घरी जाण्याच्या संख्येत घट झालेली आहे. नवीन कोरोनाबाधितांची आकडेवारीत झालेली वाढ आणि रुग्ण घरी जाण्याची संख्येत झालेली घट फार मोठी नसली तरी चिंतेची बाब जरुर आहे.


दरम्यान, 7 जूनपासून महाराष्ट्र पाच स्तरांमध्ये अनलॉक होण्यास सुरु झाला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने 5 जून रोजी पहाटे याबाबतची अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेनुसार पहिल्या स्तरामध्ये येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंधि असतील, तर तर पाचव्या स्तरातील निर्बंध अधिक कडक असतील.


मुंबईत कोरोना रुग्णवाढ दुपटीचा वेग 722 दिवसांवर


मुंबईत कोरोना संसर्गाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्येचा डबलिंग रेट हा 722 दिवसांवर गेला आहे. मंगळवारी मुंबईत कोरोनाचे 570 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 742 रुग्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. दरम्यान, कोरोनामुळे मंगळवारी 10 रुग्णांचा मृत्यू झाले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.  


मुंबईतील कोरोनाचं प्रमाण काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपासून मुंबईत एक हजाराच्या खाली रुग्णसंख्या आल्याचं दिसून येत आहे. काल दिवसभरात 32 हजार 307 कोरोना चाणण्या करण्यात आल्यानंतर 742 जण संक्रमित आढळले आहेत. सध्या शहरात 14 हजार 453 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रिकव्हरी रेट आता 95 टक्के इतका झाला आहे. 15 जून ते 21 दरम्यान कोरोनाचा ग्रोथ रेट हा 0.09 टक्के इतका आहे. दिलासादायक म्हणजे कोरोना रुग्णसंख्येचा डबलिंग रेट हा 722 दिवसांवर गेलाय. मुंबईत सध्या 11 कंटेनमेंट झोन आहेत.


मुंबई अनलॉकच्या पहिल्या गटात, मात्र लेव्हल 3 चेच निर्बंध लागू


कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यावरुन मुंबई सध्या अनलॉकच्या पहिल्या गटात आहे. परंतु तरीही मुंबई लेव्हल 3 मध्येच कायम राहणार आहे. म्हणजेच मुंबईत सध्यातरी लोकल सेवा सुरु होणार नाही. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी याबाबत परिपत्रक जारी केलं असून शहरात आजपासून 27 जूनपर्यंत लेव्हल 3 चे निर्बंध कायम राहतील.