मुंबई : राज्यात आज तर 24,136 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 36,176 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 601 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज पुन्हा एकदा दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.  राज्यात आज एकूण 3,14,368  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  


आजपर्यंत एकूण 52,18,768 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.76 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 601 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.59 टक्के एवढा आहे.


आज नोंद झालेल्या एकूण 601 मृत्यूंपैकी 389 मृत्यू हे मागील 48 तासातील आहेत तर 212 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोवि पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूंमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 536 ने वाढली आहे. 


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,35,41,565 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,26,155 (16.77 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 26,16,428 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 20,829 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 1037 रुग्णांची नोंद


मुंबईत मागील 24 तासात 1,037 रुग्णांचे निदान झाले आहे. तर  1417 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत मुंबई 6 लाख 55 हजार 425 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर आला आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 345 दिवसांवर गेला आहे.  मुंबईत सध्या 27 हजार 649 अॅक्टिव रुग्ण आहेत. आज मुंबईत 37 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत मुंबई 14 हजार 708 रुग्णांनी जीव गमावला आहे. 


जिल्हानिहाय कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण



  1. मुंबई- 27855

  2. ठाणे- 23702

  3. पालघर- 8033

  4. रायगड- 5477

  5. रत्नागिरी- 4820

  6. सिंधुदुर्ग- 4099

  7. पुणे- 45648

  8. सातारा- 18909

  9. सांगली- 14961

  10. कोल्हापूर- 15517

  11. सोलापूर- 15370

  12. नाशिक- 12793

  13. अहमदनगर- 13885

  14. जळगाव- 7483

  15. नंदुरबार- 975

  16. धुळे- 2499

  17. औरंगाबाद- 5992

  18. जालना- 4713

  19. बीड- 9083

  20. लातूर - 4434

  21. परभणी- 4705

  22. हिंगोली- 2068

  23. नांदेड- 3768

  24. उस्मानाबाद- 4480

  25. अमरावती- 8655

  26. अकोला - 5869

  27. वाशिम - 2877

  28. बुलढाणा - 3833

  29. यवतमाळ - 3831

  30. नागपूर - 14556

  31. वर्धा- 4024

  32. भंडारा - 1597

  33. गोंदिया - 1290

  34. चंद्रपूर- 4978

  35. गडचिरोली - 1563