मुंबई : राज्यात आज 2740 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 233 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 09 हजार 021 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 05 टक्के आहे.
राज्यात आज 27 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 49 हजार 880 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,102 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (5), नंदूरबार (3), धुळे (1), जालना (36), परभणी (50), हिंगोली (16), नांदेड (23), अमरावती (97), अकोला (28), वाशिम (1), यवतमाळ (9), वर्धा (4), भंडारा (1), गोंदिया (5), चंद्रपूर (50), गडचिरोली (15) या 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 60,88,114 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,00,617 (11.59 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,99,192 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,883 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील 10 जिल्ह्यात आज शून्य रुग्णांची नोंद
राज्यातील 51 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. राज्यात आज 10 जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. धुळे, नंदुरबार, परभणी, नांदेड, अकोला अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांचा यात समावेश आहे.
देशात आज 27,254 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 27,254 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर एकादिवसापूर्वी 28,591 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. अशातच गेल्या 24 तासांत 219 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 37,687 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
संबंधित बातम्या
- India Coronavirus Updates : देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट, 24 तासांत 27 हजार नवे कोरोनाबाधित
- Bharat Biotech Covid Vaccine: कोवॅक्सिन लसीला आठवडाभरात WHO ची मंजुरी मिळण्याची शक्यता