मुंबई- केवळ आरोप करत राहणं ही भाजपची जुनी सवय आहे. मागे ते म्हणायचे आम्ही बैलगाडी भरून पुरावे सादर करणार. 24 हजार पानांची पुराव्याची फाईल आमच्याकडे आहे. परंतु झालं काय त्यांनी सादर केलेले पुरावे सगळे रद्दीत गेले आहेत. त्यामुळे माझं त्यांना सांगणं आहे जर तुम्हांला रद्दीचं हवी असेल तर कुर्ल्याला या मी तुम्हांला 10- 20 ट्रक रद्दी देतो अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांची खिल्ली उडवली.
याबाबत अधिक बोलताना नवाब मलिक म्हणाले, सोमय्या खोटं आरोप करणे आणि खोटे बोलणे यामध्ये प्रसिद्ध झाले आहेत. जे आरोप करण्यात आले त्यात कुठेही तथ्य नाही. केवळ राजकीय हेतूने आरोप करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सदनबाबत आरोप करण्यात आले होते त्यामधून भुजबळांना क्लिनचिट मिळाली आहे. सध्या केवळ राजकीय हेतूने आरोप होत आहेत कारवाई केली जाते मात्र यातून काही साध्य होत नाही. लोकं दोषमुक्त होत आहेत. किरीट सोमय्या प्रसिद्धीसाठी बिनबुडाचे आरोप करत आहेत. निवडणुकीपूर्वी हसन मुश्रीफ यांच्या कारखान्यावर, घरावर ईडीची धाड पडली पण काहीच झालं नाही. मुश्रीफ साहेब त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. भाजपकडून असे अनेकवेळा आरोप झाले आहेत. हा त्यांचा जुना खेळ आहे. यामध्ये बैलगाडीभर पुरावे सादर करणार...माझं त्यांना सांगणं आहे रद्दीचं पाहिजे असेल तर कुर्ल्यात या... नुसते 24 हजार पानांचे पुरावे गोळा केले काय सांगताय...10-20 ट्रक रद्दी देतो...घ्या आणि पुरावे म्ह्णून सादर करा.
दरमान्य आगामी जिल्हा परिषद निवडणुकांबाबत बोलताना मलिक म्हणाले की, सध्या सरसकट निवडणूका होणार नाही. काही जिल्हापरिषदेच्या निवडणूक रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला होता. सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे जास्त काळ निवडणूक थांबवता येणार नाही. त्या निकालाचा फटका राज्यात बसू शकतो. त्याबाबत कायदा करून ओबीसी राजकीय आरक्षण टिकवण्याचा पर्याय राज्यासमोर आहे. तो सर्वपक्षीय नेत्यांपूढे आणण्यात आला आहे. तो मान्य झाला तर तो करता येईल. अन्यथा दुसरा पर्याय आमच्या पक्षाने समोर ठेवला आहे.रिक्त झालेंल्या त्या जागांवर आमचा राष्ट्रवादी पक्ष ओबीसी उमेदवार देणार आहोत. अनिल देशमुख त्यांच्या कुटुंबासोबत देशात आहेत राज्यात आहेत मग हा प्रश्न ते उपस्थित का करतात? ते काय फरारी आहेत का? त्यांना हद्दपार करण्यात आलं आहे का? ज्यांच्या पक्षाचे नेते हद्द पार झाले आहेत नेते फरारी आहेत त्यांनी असे प्रश्न विचारू नयेत.
गोव्यात आम्ही सत्तेत काही काळ सहभागी होतो. गोव्याच्या स्थापनेपासून आम्ही त्या ठिकाणी निवडणूका लढवत आहोत. गुजरात मध्ये आमचा आमदार आहे. उत्तरप्रदेशमध्ये सुद्धा आमचे आमदार होते. महाराष्ट्र सोडून देशात ज्या राज्यात निवडणुका लागत आहेत त्याठिकाणी असणाऱ्या आमच्या लोकांना आम्ही निवडणुका लढण्याचे अधिकार दिले आहेत. भाजप सोडून कोणत्या पक्षांसोबत आघाडी करता येऊ शकेल याबाबतचे सर्व अधिकार त्या स्थानिक नेत्यांना राहतील. भाजप सोडून ज्या पक्षांसोबत आघाडी करता येईल त्याचे प्रस्ताव केंद्रिय समितीकडे देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार त्या त्या ठिकाणी आघाडी करण्याचा अधिकार त्यांना राहील. आम्ही या राज्यात निवडणूका लढत आलो आहोत.आणि पुढे देखील लढत राहू, असेही नवाब मलिक म्हणाले