India Coronavirus Updates : कोरोना संसर्गाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये रविवारी काहीशी घट पाहायला मिळाली. आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 27,254 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर एकादिवसापूर्वी 28,591 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. अशातच गेल्या 24 तासांत 219 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 37,687 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
केरळात वाढता प्रादुर्भाव, 20 हजार नव्या रुग्णांची नोंद
केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 20,240 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 43 लाख 75 हजार 431 वर पोहोचला आहे. तसचे 67 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या वाढून 22,551 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 लाख 15 हजार 575 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. तर संसर्गाचा दर 17.51 टक्के इतका आहे.
भारतातील कोरोनाची एकूण आकडेवारी
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 32 लाख 64 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 42 हजार 874 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 24 लाख 47 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी झाली आहे. एकूण 3 लाख 74 हजार 269 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 32 लाख 64 हजार 175एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 24 लाख 47 हजार 32सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 74 हजार 269एकूण मृत्यू : चार लाख 42 हजार 874एकूण लसीकरण : 74 कोटी 38 लाख 37 हजार लसीचे डोस
राज्यात दिवसभरात 3 हजार 623 नवीन कोरोनाबाधित
राज्यात आज दिवसभरात 3 हजार 623 नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, 2 हजार 972 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याशिवाय, 46 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. अजुनही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.