मुंबई : राज्यात आज 3, 898 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 581 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 4 हजार 336 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 08 टक्के आहे.
राज्यात आज 86 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 47 हजार 926 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12,409 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (77), नंदूरबार (2), धुळे (3), जालना (51), परभणी (60), हिंगोली (18), नांदेड (28), अमरावती (76), अकोला (16), वाशिम (05), बुलढाणा (84), यवतमाळ (2), नागपूर (72), वर्धा (2), भंडारा (1), गोंदिया (5), गडचिरोली (35) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 51,59,364 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,93,698 (11.77 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,06,524 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,021 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 353 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 353 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 404 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,24,898 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3718 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1266 दिवसांवर गेला आहे.
देशात गेल्या 24 तासांत 31 हजार 222 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा धोका अद्याप टळलेला नाही. अद्यापही दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकड्यात फारशी घट झालेली नाही. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 31 हजार 222 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आलेली आहे. तर 290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्रालयाच्या वतीनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 42 हजार 942 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या वाढून तीन कोटी 22 लाख 24 हजार 937 वर पोहोचली आहे. तर सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 92 हजार 864 एवढी आहे.