मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 2895 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 432 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 62 हजार 248 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.26 टक्के आहे.
राज्यात आज 32 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 9, 243 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (06), नंदूरबार (3), धुळे (2), जालना (44), परभणी (61), हिंगोली (18), नांदेड (9), अमरावती (100), अकोला (29), वाशिम (07), बुलढाणा (15), यवतमाळ (05), वर्धा (6), भंडारा (2), गोंदिया (5), चंद्रपूर (88), गडचिरोली (31 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
राज्यात सध्या 37 हजार 043 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,57,144 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,517 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 82, 86, 036 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,41,462 (11.22 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 454 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 377 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 334 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,18,336 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात सात रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4702 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1189 दिवसांवर गेला आहे.
गेल्या 24 तासांत 26 हजार 41 नव्या रुग्णांची नोंद
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 29 हजार 624 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा सध्या तीन कोटी 29 लाख 31 हजार 972 वर पोहोचला आहे. अशातच सक्रिय रुग्णांची संख्या घटून 2 लाख 99 हजार 620 वर पोहोचली आहे. एकूण आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत तीन कोटी 36 लाख 78 हजार 786 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत कोरोनाचे चार लाख 47 हजार 194 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.