बीड : बीड जिल्ह्यातील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखीही नाराज आहेत का असा प्रश्न आता निर्माण झालाय याचं कारण आहे की जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येत असताना प्रकाश सोळंके यांनी मात्र फेसबुकद्वारे आपण अपरिहार्य कारणामुळे या दौर्‍यात उपस्थित राहू शकत नाही अशी पोस्ट टाकली आहे.


आमदार प्रकाश सोळंके हे नाराज असल्याची ही काही पहिली वेळ नाही आहे यापूर्वी सुद्धा मंत्रिपद न मिळाल्यामुळे प्रकाश सोळंके हे नाराज होते. मात्र आता पुन्हा  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त बीड जिल्ह्यात येत असताना माजलगाव मध्ये होणारा नियोजित कार्यक्रम मात्र रद्द करण्यात आला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा ही परभणी औरंगाबाद आणि जालन्यानंतर बीड जिल्ह्यात येणार आहे बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा गेवराई विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला जाणार आहे त्यानंतर नियोजित कार्यक्रम हा माजलगाव शहरातील ठेवण्यात आला होता. मात्र माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपण अपरिहार्य कारणामुळे या दौर्‍यात उपस्थित राहू शकत नाही अशी फेसबुक पोस्ट टाकल्यामुळे पक्षाकडून माजलगाव चा होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे आणि त्याऐवजी तेलगाव मध्ये पक्षाचा कार्यक्रम होणार आहे.



यापूर्वी 2019 मध्ये प्रकाश सोळंके यांनी आपण आमदारकीचा राजीनामा  देणार असल्याचे जाहीर केले होते विशेष म्हणजे या संदर्भात त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होते आणि जयंत पाटील यांच्यासोबत ही चर्चा केली होती.. आपण चार चार वेळा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सुद्धा आपल्याला मंत्रिपद दिले जात नाही ही खंत प्रकाश सोळंके यांनी बोलून दाखवली होती..


एकीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जिल्ह्यांमध्ये येत असल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे ठिकाणच्या बैठकीला हजेरी लावताना चित्र पाहायला मिळत आहे. मात्र जिल्ह्यातील पक्षाचे नेते आणि आमदार प्रकाश सोळंके हे मात्र अनुपस्थित आहेत आता नेमके कोणत्या कारणामुळे प्रकाश सोळंके अनुपस्थित आहेत हे समजू शकले नाही मात्र फेसबुक पोस्ट मध्ये त्यांनी अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहत नसल्याचे सांगितले आहे.


प्रकाश सोळंके यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रे मधील अनुपस्थितीमुळेच पक्षाने अखेर माजलगावचा कार्यक्रम रद्द केला आहे.  मात्र माजलगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी माजलगाव सहकारी साखर कारखान्यावर ती बैठक ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे प्रकाश सोळंके यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रकाश सोळुंके हे नाराज आहेत का याची चर्चा जोर धरू लागली आहे.