मुंबई : राज्यात आज 869 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1328 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 


राज्यात  दोन कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,50, 302 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.08 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात एकूण 7701 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 


राज्यात एकूण 7701 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये  मुंबईत सर्वाधिक म्हणजे 2540 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 1754  सक्रिय रुग्ण आहेत.


मुंबईत मंगळवारी 285 रुग्णांची नोंद, 516 कोरोनामुक्त


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी 516 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,24,474 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.0 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,711 झाली आहे. सध्या मुंबईत 2,540 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 285 रुग्णांमध्ये 266 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 2094 दिवसांवर गेला आहे.


 देशात नवीन 5910 रुग्ण


 देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच रविवारी दिवसभरात 5 हजार 910 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्याच्या आदल्या दिवशी शनिवारी 6 हजार 809 कोरोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे रविवारी तुलनेनं रुग्णांची संख्या 899 ने घसरली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट झाल्याची बाब दिलासादायक आहे. याआधी 31 ऑगस्ट 2022 रोजी कोरोनाबाधितांची संख्या पाच हजारांवर पोहोचली होती. तेव्हा 5 हजार 439 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.  देशात गेल्या 24 तासांत 7 हजार 34 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. देशातील उपचाराधीन असलेल्या कोरोना रुग्णांची संख्याही घटली आहे. सध्या देशात 53 हजार 974 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 5 लाख 28 हजार 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.