Sangli : अतिविषारी घोणस अळी सांगली जिल्ह्यातही आढळून आली आहे. कडेगाव तालुक्यातील अंबक येथील अश्विनी नंदकुमार जगदाळे (वय 20) या तरुणीला घोणस अळीने दंश केला. यामुळे तीव्र वेदना होऊन तिचा पाय सुजला आहे. तिला उपचारासाठी चिंचणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.


शेतकऱ्यांसमोर घोणस नावाच्या अळीचं नवं संकट उभं राहिलं आहे. अंबक येथील शतातील घरात राहत असलेल्या कुटुंबातील अश्विनीला पायाखाली घोणस आळी आल्यानंतर दंश तळपायाला झाल्याने चिंचणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.   


बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला घोणस आळीने दंश केल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता हे संकट सांगली जिल्ह्यात आल्याने शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे. अश्विनी रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घराबाहेर वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी गेली होती. यावेळी घराजवळ असलेल्या गवतात असलेल्या घोणस नावाची विषारी अळीवर तिचा पाय पडला. 


यावेळी तिच्या तळपायाला आळीने दंश केला व अळीच्या अंगावरील काटे तळपायाला टोचले. यानंतर वेदना असह्य झाल्यानं तिला चिंचणी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर पुढील उपचारासाठी चिंचणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. आश्विनीच्या आईने ही आळी प्लास्टिकच्या पिशवीतून डॉक्टरना दाखवण्यासाठी रुग्णालयात आणली होती. यामुळे ती घोणस आळी असल्याचे स्पष्ट झाले.


इतर महत्वाच्या बातम्या