मुंबई :  राज्यात कोरोना रुग्णांचा (Corona Update) आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 98 टक्क्यांवर आले आहे. राज्यात आतापर्यंत 79,53,080 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 

Continues below advertisement

राज्यात गुरूवारी  1031 रुग्ण कोरोनामुक्त (Maharashtra Corona Update) 

राज्यात गुरूवारी 1076 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1031 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

Continues below advertisement

सहा कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 

राज्यात  सहा कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,53, 080 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.08 टक्के इतकं झालं आहे. 

राज्यात एकूण 7082 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 

राज्यात एकूण 7082 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये  मुंबईत सर्वाधिक म्हणजे 2236 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 1554 सक्रिय रुग्ण आहेत.