Maharashtra Assembly Election 2024 नागपूर : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी संपली असून आता  विधानसभा निवडणुकांचे  (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) वारे सध्या वाहू लागले आहेत. अशातच आगामी विधानसभेची (Maharashtra Assembly Election 2024) अद्याप घोषणा झालेली नसली तरी, पुढील विधानसभेसाठी जवळ जवळ सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली असून राजकीयदृष्ट्या सर्वांगाने जुळवाजुळव सुरू केली आहे. अशातच गेल्या गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) विदर्भात घवघवीत यश मिळाले होते. तर राज्यासह विदर्भातही काँग्रेस मोठा पक्ष ठरला होता. 


परिणामी, येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील काँग्रेसनं (Congress) विदर्भ अन् मराठवाड्यावर विशेष लक्ष दिले असल्याचे दिसून आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून काँग्रेस विदर्भ आणि मराठवाड्यावर खास फोकस करत आहे. लवकरच त्या अनुषंगाने मराठवाडा आणि विदर्भात खास बैठकांच आयोजन केलं जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.  


काँग्रेसचे प्रदेश प्रभारी यांच्यासह ज्येष्ठ नेते 10 ऑगस्टपासून दौऱ्यावर


मराठवाडा आणि विदर्भांत मिळून एकूण 10 जिल्हानिहाय बैठका घेण्याचं नियोजन असून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वात स्थानिक जिल्हा पदाधिकार्‍यांसोबत या बैठका होणार आहेत. या बैठकांमध्ये काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील अनेक काँग्रेसचे प्रमुख नेतेही या बैठकीत सहभागी होणार आहेत. येत्या 10, 11 आणि 12 ऑगस्ट रोजी लातूर, नांदेड आणि संभाजीनगर या ठिकाणी  मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांसाठीच्या बैठका होणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे. तर 13 ऑगस्ट रोजी बुलढाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यासाठी तर 14 ऑगस्टला रोजी  अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी ची बैठक पार पडणार आहे. 


या बैठकांच्या माध्यमातून काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला आणि राज्य काँग्रेसमधील वरिष्ठ काँग्रेस नेते कार्यकर्त्यांच्या मनातील गोष्टी जाणून घेणार आहेत. तसेच स्थानिक पातळीवर विविध मतदारसंघात पक्षाची रणनीती काय असावी, या संदर्भातही मंथन करणार आहेत.


विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचाही प्लॅन ठरला!


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकस आघाडी प्रमाणेच महायुतीनेही राजकीय हालचालींना सुरुवात केलीय. गुरुवारी रात्री मुंबईत महायुतीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. राज्यात महायुतीचे समन्वयचे मेळावे आणि संवाद दौरे होणार आहेत.  प्रत्येक विधानसभेत एक सभा घेण्याचं निर्णय घेण्यात आला आहे. या महिनेच्या 20 तरखेपासून सातही विभागमध्ये दौरे सुरु होतील. या सातही विभागांमध्ये मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा होणार असल्याची माहिती भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिली. तर आठवी आणि शेवटी जाहीर सभा मुंबईत होणार आहे.


दौरा कमीत कमी सात दिवसाच आणि जास्त जास्त दहा दिवसाचा असणार आहे. प्रत्येक दिवशी दोन किंवा तीन विधानसभा कव्हर करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रसाद लाड म्हणाले. त्या मतदारसंघाचे स्थानिक नेते पदाधिकारी सभेमध्ये उपस्थित असणार आहेत. पाच ते दहा हजाराचा लोकांचा एक मेळावा घेण्यात येणार आहे. कोल्हापुरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन 20 तारखेपासून प्रचाराची सुरुवात होईल असे लाड म्हणाले. 


हे ही वाचा