Congress News : अपघाताने आणि कोणाच्या तरी पुण्याईनं आमदार झालेल्या अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) काँग्रेसला (Congress) उपकाराची भाषा न शिकवू नये. त्यांनी काँग्रेसचा इतिहास वाचावा असा सल्ला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते कपिल ढोके (Kapil Dhoke) यांनी मिटकरींना दिला आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रात काँग्रेसचे चारही आमदार निवडून आले नसते. मात्र, शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेससाठी सभा घेतल्यानेच काँग्रेसचे 44 आमदार निवडून आल्याचं वक्तव्य मिटकरींनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं टीका केली आहे.


राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी मिटकरींना समज द्यावी


अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर प्रदेश युवक काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते कपिल ढोकेंनी जोरदार टीका केली आहे. कोणाच्या तरी पुण्याईने आमदार झालेल्या अमोल मिटकरींनी काँग्रेसला उपकाराची भाषा न शिकविण्याचा सल्ला ठाकेंनी त्यांना दिला आहे. यासोबतच अमोल मिटकरींना काँग्रेसचा इतिहास वाचण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी मिटकरींना समज देण्याची मागणीही कपील ढोके यांनी केली आहे.


नेमकं काय म्हणाले होते अमोल मिटकरी?


2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेल्या मदतीमुळे काँग्रेसचे 44आमदार निवडून आले होते असं वक्तव्य आमदार मिटकरी यांनी केलं होतं. मागील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे कोणतेही वरिष्ठ नेते प्रचारात फिरले नव्हते. मात्र, साताऱ्याची शरद पवार यांची सभा झाली आणि ज्या काँग्रेसचे चारही आमदार निवडून येणार नव्हते, त्यांचे 44 आमदार निवडून आले. ही पुण्याई कॉंग्रेसवाल्यांनी विसरू नये. शरद पवार नावाच्या योद्धाची ही पुण्याई आहे, असे मिटकरी म्हणाले होते. त्याचबरोबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या  सर्वाधिक जागा निवडून येतील असेही मिटकरी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसनं आता जोरदार टीका केली आहे. त्यांना काँग्रेसचा इतिहास वाचण्याचा सल्ला दिला आहे. तसेच उपकाराची भाषा आम्हाला शिकवू नये असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.


महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते कपिल ढोके (Kapil Dhoke) यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे. ढाके यांनी केलेल्या टिकेला आता अमोल मिटकरी काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


अकोला राष्ट्रवादीतील वाद नव्या वळणावर! अमोल मिटकरींकडून अकोला जिल्हाध्यक्षांवर पाच कोटींचा मानहानीचा दावा