Nana Patole on Maharashtra CM : नेहमीच आपल्या बेधडक शैलीत बोलणाऱ्या काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आज पुन्हा एक वाक्य ट्वीट करत खळबळ उडवून दिली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 






तिकडे देशपातळीवर काँग्रेसचं नेतृत्व कुणाकडे द्यायचं यावर खल चालू असताना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.


महाराष्ट्रामध्ये शिवसेना-राष्ट्रवादी- काँग्रेस अशी तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडी असली तरी नाना पटोले हे निवडणुका लढवण्याबाबत असो किंवा सत्तेतील वाटा असो या गोष्टींवर सडेतोडपणे बोलताना दिसून आले आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असून आमच्या मित्र पक्षांचं काय प्लानिंग आहे याबद्दल मला कल्पना नाही असं  नाना पटोले यांनी म्हटलं होतं. 


नुकत्याच लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालावर बोलताना नाना पटोले यांनी आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे, असं म्हटलं होतं. आज सकाळीच ट्वीट करत त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत भाष्य केलं होतं. राजस्थान,छत्तीसगढप्रमाणे महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, असं नाना पटोलेंनी म्हटलं होतं.






संबंधित इतर बातम्या






LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha