Maharashtra Chiplun News : चिपळूण तालुक्यातील पाते पिलवली गव्हाणवाडी येथे रात्री बिबट्या घरात घुसला. त्याच्या उडीचा आवाज ऐकून घरातील महिला जागी झाली. तिने लाईट लावतात बिबट्याची आणि तिची नजरानजर झाली त्यावरून बिबट्याने पती-पत्नीला पंजा मारून घाबरवले आणि तो स्वयंपाक घरात लपला. यामुळे मुलाला घेऊन पती-पत्नी घरातून बाहेर पडले ही थरारक घटना गुरुवारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे.
सकाळी माळ्यावर लपलेल्या बिबट्या सर्वांना गुंगारा देत क्षणार्धात जंगलात नाहीसा झाला. गुरुवारी पाते पिलवली गव्हाणवाडीत तीन वर्षांचा बिबट्या शिरला. कोंबड्या फस्त करण्यासाठी बिबट्या तुकाराम गंगाराम सुवरे यांच्या घराजवळ आला. हे घर एका बाजूने उघडे आहे. कोंबड्यांच्या शोधात बिबट्याने घरात उडी मारली. धपकन काय पडले हे पाहण्यासाठी सुनिता तुकाराम सुर्वे यांनी माजघरातली लाईट लावली. तेव्हा समोर आलेल्या बिबट्याची आणि त्यांची नजरानजर झाली. बावचळलेला बिबट्या सुनिता सुर्वेंना पंजा मारून परत पळून जाण्यासाठी स्वयंपाक घरात गेला. मात्र तिथून बाहेर पडण्यासाठी जागा नसल्यानं तो परत माजघरात संदुकीवर येऊन बसला. सुनिता यांनी मुलाला उठवले, पुन्हा हालचाल झालेली लक्षात येताच बिबट्या तिथल्या खॉटखाली जाऊन लपला. त्याच खॉटवर सुनिता सुर्वे यांचे पती तुकाराम सुर्वे झोपले होते. त्यांना काहीच कळले नव्हते. खॉटखाली बिबट्या गेल्यावर सुनिताने तुकारामांना उठवले. खॉट हलल्यानं घाबरलेल्या बिबट्यानं तुकाराम यांच्या डोक्यात पंजाब मरून पुन्हा स्वयंपाक घरात पळ काढला. सुनिता, तुकाराम आणि मुलगा घराबाहेर पडले. आरडाओरडा केला, ग्रामस्थांनी जखमी पती-पत्नीला डेरवण येथील रुग्णालयात नेले. जखमी पती-पत्नी यांची प्रकृती उत्तम असल्याचं परिक्षेत्र वन अधिकारी राजेश्री किर यांनी सांगितले आहे.
... आणि बिबट्या पसार
सकाळी परिक्षेत्र वनअधिकारी आणि पोलीस आपल्या यंत्रणेसह घटनास्थळी पोहचले. वनरक्षकांनी घरात शोध घेतला. त्यावेळी माळ्यावर बिबट्या लपून बसला असल्याचे लक्षात आले. घराचे दोन्ही दरवाजे आणि खिडक्या उघडून बिबट्याला बाहेर कसे काढायचे? याची चर्चा करत होते. तितक्यात बिबट्याने मागील दाराने जंगलात पळ काढला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :