Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहरात चोरीच्या (Theft) घटना घडत असतानाच आता ग्रामीण भागात देखील चोरांनी आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरीक सततच्या या चोरीच्या घटनांनी हतबल झाले आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या पिसादेवी गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी (Gram Panchayat Member) चक्क चोरीच्या घटनांना आळा घालण्याची मागणी करत उपोषण केले. यावेळी गावकऱ्यांची देखील मोठ्याप्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली. तर अखेर पोलिसांनी उपोषणास्थळी भेट देऊन, गस्त वाढवण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. 


गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पिसादेवी गावातील वाहन चोरीच्या घटना मोठ्याप्रमाणात वाढल्या आहे. गावकऱ्यांनी यासाठी पोलिसांना निवदेन देऊन, पोलीस गस्त वाढवण्याची मागणी वारंवार केली. मात्र पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला. गावातील नागरिकांसह ग्रामपंचायत सदस्यांनी थेट उपोषण सुरु केले. तर पोलिसांकडून ठोस असे आश्वासन मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची गावकऱ्यांनी भूमिका घेतली. 


गावकऱ्यांचे निवेदन...


गावकऱ्यांनी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, पिसादेवी 15 ते 20  हजार लोकवस्तीचे गाव असुन, गाव अत्यंत शांतताप्रिय आहे. गावाने आतापर्यंत पोलीस प्रशासनास नेहमीच सहकार्य केले आहे. गावात राहणारे लोक हे शेतकरी व कामगार आहेत. मध्यम वर्गीय लोकांचे हे गाव असून, कष्टकरी लोक येथे राहतात. परंतू गेल्या 8 ते 10 महिन्यापासून चोरांनी पिसादेवी गावामध्ये उच्छाद मांडला आहे. दर दोन-चार दिवसाआड येथे वाहने चोरीला जात आहे. ज्यात दुचाकी आणि चारचाकी अशा गाड्यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी भर दुपारी राधेकृष्ण अपार्टमेन्टमध्ये चोरांनी चोरी करुण सोने नाने, रोख रक्क्म पळवली आहे. असे असताना पिसादेवी येथे होणाऱ्या चोरीच्या घटनांचा तपास पोलीस प्रशासन लावू शकले नाही. 


पोलिसांनी ठोस पाऊले उचलावे! 


गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या घटना पाहता चोरांना आता कुठलाच धाक राहीला नसल्याचे पाहायला मिळत नाही. त्यामुळे पिसादेवीचे नागरीक हे भयभीत झालेले आहे. मात्र गावकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पोलिसांकडून काहीच हालचाल होताना दिसत नाही. अनेक दिवसापासुन पोलीस चौकीची मागणीसुध्दा पिसादेवी करांची असुन, सुद्धा ती ही पुर्ण झालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी गावकऱ्यांची मागणी लक्षात घेता ठोस पाउले उचलावे अशी मागणी निवदेनातून गावकऱ्यांनी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: