Vinod Patil On Gunratna Sadavarte : नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांची वकिलीची सनद महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलकडून दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आली आहे. तर सदावर्ते यांनी वकिली आचारसंहितेचं उल्लंघन करुन, वकिली गणवेशात आंदोलनात भाग घेतल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान या निर्णयानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येताना पाहायला मिळत आहे. तर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना योग्य निर्णय झाला असल्याचे म्हटले आहे.


दरम्यान यावर बोलताना विनोद पाटील म्हणाले की, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो. कायद्यापेक्षा कोणेही मोठं नसतं, कायद्यापेक्षा कोणेही श्रेष्ठ नसतं हे त्यांनी आज पायंडा घालून दिला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. प्रत्येक प्रकरणात कायद्याची बाजू न मांडता एक वेगळ्या प्रकारचा वाव आणण्याचा ते सतत प्रयत्न करत होते. मात्र जेव्हा ही बाब बार कौन्सिलच्या लक्षात आली त्यांनी दोन वर्षांसाठी सदावर्ते यांची सनद जप्त केली असून, हा योग्य निर्णय आहे. तर हा योग्य निर्णय झाल्याने कायद्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना प्रत्येकाला आज बार कौन्सिल अस्तित्वात असल्याचा विश्वास वाटत आहे. तसेच बार कौन्सिल योग्य निर्णय करत असल्याचे देखील स्पष्ट झाले असल्याचं विनोद पाटील म्हणाले. 


दोन वर्षे वकिली करता येणार नाही...


वकिलीची वेशात सार्वजनिक ठिकाणी आंदोलन केल्याचं ठपका  अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर ठेवत  त्यांच्याविरुद्ध दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. तर वकिलांसाठी एक आचारसंहिता असून, त्याचं सदावर्ते  यांनी उल्लंघन केल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यातील पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या आंदोलनाबद्दल त्यांच्यावर बार कौन्सिलने कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे दोन वर्षासाठी आता सदावर्ते कोणत्याही कोर्टात वकिली करु शकणार नाही. तसेच न्यायालयात वकील म्हणून कुणाचीही बाजू मांडू शकणार नाहीत.


मराठा आरक्षणाला केला होता विरोध...


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात लाखोच्या संख्येने मोर्चे निघत असताना, 2014 साली मराठा आरक्षणाविरोधात पहिली याचिका दाखल करण्यात आली होती. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील यांनी, 'मराठा समाजाला आरक्षण देणे हे असंवैधानिक असल्याचं मत व्यक्त करत'  मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. तर गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात याबाबत त्यांची बाजू मांडली होती. त्यामुळे या काळात मराठा समाजाच्या वतीने सदावर्ते यांना मोठा विरोध झाला होता. तर अनेकदा माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देताना गुणरत्न सदावर्ते आणि विनोद पाटील यांच्या शाब्दिक चकमक पाहायला मिळायची. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांकरता निलंबित, शिस्तभंग केल्याबद्दल बार कौन्सिलचा निर्णय