Imtiyaz Jaleel On Maharashtra Bhushan Award Program: नवी मुंबईतील खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यानंतर अनेकांना उष्माघाताचा (Heath Stroke) त्रास झाला आणि यामध्ये एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 600 जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. तर यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी देखील यावरून सरकारवर टीका केली आहे. श्री सेवकांच्या मतांसाठी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) 13 जणांची हत्या केली असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. तर या लोकांनी फक्त तीन तास उन्हात उभं राहून दाखल्यावर मी 10 लाख रुपये देतो, असे आव्हान देखील जलील यांनी दिले आहे. 


दरम्यान याबाबत बोलताना जलील म्हणाले की, 20 लाख अनुयायांच्या मतांसाठी गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13 जणांची हत्या केली आहे. अनुयायांची मत लक्षात घेऊनच सोहळा मोठा केला गेला. सामान्य लोकांच्या जीवाची किंमत पाच लाख रुपये करता. मग तुमच्या जीवाची किंमत सांगा? असे जलील म्हणाले. तर गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी तीन तास उन्हात थांबवून दाखवाव, मी त्यांना 10 लाख रुपये देतो, असे आव्हान देखील जलील यांनी दिले. 


चर्चा होऊ नये म्हणून अजित पवारांचा विषय काढला


दरम्यान पुढे बोलताना जलील म्हणाले की,  नवी मुंबईतील खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारसाठी लाखो लोकं उपस्थित होते. मात्र यावेळी नेत्यांसाठी विशेष मंडपाची सोय करण्यात आली होती. परंतु कार्यक्रमासाठी आलेल्या श्री सेवकांना भर उन्हात बसवण्यात आले. यात 13 लोकांचा बळी गेला आहे. त्यानंतर काय केलं रुग्णालयात गेले आणि पाच लाखांच्या मदतीची घोषणा केली. त्यामुळे मी तुम्हाला विचारतो तुमच्या जीवाची काय किंमत आहे, असे जलील म्हणाले. विशेष म्हणजे 13 जणांचा बळी गेल्यानंतर त्यावर चर्चा होऊ नये म्हणून अजित पवारांचा विषय काढला गेला असल्याचा आरोप देखील जलील यांनी केला आहे. 


अन्यथा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खुर्ची गेली...


पुलवामामध्ये काय झालं होतं, मलिक यांना त्यावेळी कसे गप्प बसण्याचे सांगितले गेलं याबाबत माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यांच्या याच आरोपाच्या दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशमध्ये अतिक अहमदवर गोळीबार करून हत्या करण्यात आली. त्यामुळे सर्व फोकस त्या घटनेकडे गेलं. मलिक यांनी केलेले आरोप गंभीर होते. त्यांच्या आरोपांवर जर चर्चा झाली असती तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खुर्ची गेली असती. पण हा विषय चर्चेत येऊ नयेत म्हणून, आपली सरकार असल्याने गोळीबारची घटना घडवण्यात आल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra Bhushan Award : 'आप्पांचे भक्त उन्हात आणि आप्पांमुळे मत मिळतील ते सावलीत'; जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर निशाणा