Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील एका गावात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सख्या भावासह मावस दाजीने वेळोवेळी जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. दरम्यान या अत्याचारानंतर पीडित मुलगी गरोदर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बळजबरी शरीरसंबंध ठेवून अल्पवयीन मुलीला गरोदर केल्याप्रकरणी दाजी व भावा विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालय समोर उभे केले असता, त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2022 मध्ये नाशिक जिल्ह्यातील मावस बहिणीच्या नवऱ्याने गंगापूर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या राहत्या घरी तिच्यावर अत्याचार केला. दिवाळी दरम्यान घरात कोणी नसताना, माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत व जीवे मारण्याची धमकी देत मुलीवर बलात्कार केला. तसेच रात्रीच्या वेळेस अंघोळीच्या बाथरुममध्ये बळजबरीने शारीरीक संबंध केले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात मुलगी प्रचंड घाबरून गेली होती. मात्र जीवे मारण्याची धमकी दिल्याने याबाबत कोणाला काहीही सांगितले नाही.
सख्या भावाने बळजबरीने शारिरीक संबंध ठेवले
दरम्यान एकीकडे मावस बहिणीच्या नवऱ्याने अत्याचार केल्याचे उघडकीस आल्यावर, मुलीने आपल्या सख्या भावा विरुद्ध देखील तक्रार देत अत्याचार केल्याची माहिती दिली आहे. पिडीत महिलेचा सख्खा भावाने देखील नववीच्या वर्गात शिकत असल्यापासून ते डिसेंबर 2022 च्या दरम्यान राहत्या घरात वेळोवेळी बहिणीच्या इच्छेविरुध्द बळजबरीने शारिरीक संबंध ठेवले. मुलीची इच्छा नसताना तिला धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. मात्र मुलगी गर्भवती राहिल्याने अखेर तिने पोलीस ठाणे गाठून आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेत तत्काळ गुन्हा दाखल करून, आरोपींना बेड्या ठोकल्या आहे.
पोलिसांनी ठोकल्या बेड्या...
अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून मावस दाजी व सख्खा भाऊ विरुध्द पोस्को व बलात्कार करुन गर्भवती केल्या प्रकरणी शिल्लेगांव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक करून गंगापूर न्यायालयात उभे केले असता तिन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. या कारवाई मध्ये पुढील तपास गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक डी एस साखळे, पोलीस नाईक सचिन चव्हाण, पोलीस अमलदार भरत घुगे, महिला पोलीस हवालदार निंबोरकर हे करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Chhatrapati Sambhaji Nagar: वैजापूरच्या 'खान गल्लीत' सुरु होता वेश्यव्यवसाय; पोलिसांनी केली छापेमारी