Buldhana : आजकाल सर्वसामान्य लग्न म्हटलं की अनेक नवीन चालीरीती आल्या. त्यातही मद्यपान करून लग्नात अवास्तव खर्च करणे नित्याचेच झाले आहे. पण एखाद्या शिक्षित समाजाला लाजवेल असा ऐतिहासिक निर्णय बुलढाणा जिल्ह्यातील आदिवसींनी घेतला आहे. हा निर्णय नेमका काय आहे ते जाणून घ्या.
काय आहे नेमका निर्णय ?
बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद आणि संग्रामपूर या आदिवासी पाड्यांचा भाग आहे. या तालुक्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर राहणाऱ्या आदिवासी बांधवांत पारंपारिक एक पद्धत होती. ही पद्धत म्हणजे लग्न असो किंवा मृत्यू नंतरची तेरवी. या कार्यक्रमात आदिवासी बांधव भरपूर मध्यपान आणि मांसाहार करीत असत. पण, आता यापुढे कुठल्याही लग्नात किंवा मरणातील कार्यक्रमात कुणीही मध्यपान किंवा मांसाहार करणार नाही. असा ऐतिहासिक निर्णय आदिवासी बांधवांनी घेतला आहे. पारंपरिक चालीरीतींना फाटा देत अनाठायी खर्च आणि व्यसनमुक्तीच्या दिशेने पाऊल टाकण्याच्या उद्देशाने या आदिवासी बांधवांनी हा निर्णय घेतला आहे.
शहरातील झगमगाटापासून कोसो दूर राहणाऱ्या या आदिवासी बांधवाना ही आता कळून चुकलं आहे. की, अनाठायी चालीरीती आणि खर्च करून आपण आपलंच नुकसान करून घेत आहोत. आपण बघत असलेल्या शहरातील सर्व सामान्य लग्नात किंवा कार्यक्रमात मध्यपान करून डीजेच्या तालावर नाचणारी सुशिक्षित तरुणाई असो किंवा लग्नात अवास्तव खर्च करणारी पालक मंडळी. या सर्वांना लाजवेल असा हा निर्णय आहे. या आदिवासी म्हणवणाऱ्या समाजाने हा एक क्रांतिकारी आणि ऐतिहासिक निर्णय घेऊन समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. याबाबत या परिसरातील शाळेतील शिक्षकांनी या निर्णयाबद्दल आदिवासी बांधवांचं मार्गदर्शन केलं. तसेच, आदिवासी बांधवांच्या या निर्णायाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Beed: वक्फ बोर्डाची जमीन घोटाळ्याप्रकरणी उपजिल्हाधिकारी, मंडल अधिकाऱ्यांसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
- NABARD : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी धोरण निश्चित करावे - मुख्यमंत्री
- Jayant Patil : सोलापूरवर शरद पवार यांचे विशेष प्रेम, पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात दिल्यास प्रश्न सोडवण्यास कटीबद्ध : जयंत पाटील
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha