Narayan Rane : दिशा सालियन प्रकरणात कालच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना पत्र लिहून भाजप नेते नारायण राणे असंवेदनशील राजकारण करून दिशा सालियन यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्य महिला आयोगाच्या काही सदस्या दिशा सालियनच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी तिच्या घरी गेल्या आहेत. 


महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल महीला आयोगाला पत्र पाठवल्यानंतर आज पुन्हा भाजपचे नेते नितेश राणे यांनी दिशा सालियन बाबत ट्वीट केलं आहे. त्यामुळे दिशा सालियनच्या आई-वडिलांची भेट घेण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्य महिला आयोगाच्या दोन सदस्या त्यांच्या निवास्थानी दाखल झाल्या आहेत. 


सुशांतसिंह राजपूत केसमधील दिशा सालियन प्रकरणात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महिला आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेतली आहे. मालवणी पोलिसांना 48 तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  माढा तालुक्यातील पिंपळनेर मधील स्नेहल मंगल कार्यालयात पक्षाचा जन संवाद कार्यक्रम पार पडला. यानंतर त्या माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 


सुशांतसिंह आणि दिशा सालियान प्रकरणात महापौर पेडणेकर यांनी महिला राज्य आयोगाकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यांच्या आलेल्या अर्जाची आम्ही दखल घेतली असून मालवाणी पोलीस स्टेशनचे वरिष्ट पोलीस निरीक्षकांना या बाबतचा जो काही अहवाल आहे, तो 48 तासांमध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दिशा सालियनचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट तिच्या आई वडीलांना मान्य आहे. त्यांनी त्याला दुजोरा दिला असल्याचं देखील चाकणकर यांनी सांगितलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :  



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha