Nana Patole on PM Modi :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आईला भेटण्यासाठी जातात आणि कॅमेऱ्याकडे पाहून फोटो काढतात. राहुल गांधी मात्र आईच्या बुटाची लेस बांधताना पायाकडेच पाहतात, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील चिखली इथे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. त्यांनी नियोजनासंदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदींवर टीका केली.


केंद्राने जीएसटी (GST) च्या रुपानं पैसे जमा केले. त्यात अदानीचे 12 हजार कोटींचं कर्ज माफ केलं. हा आपला पैसा आहे, आपल्या पैशात हे कर्ज माफ केल्याचे नाना पटोले यावेळी म्हणाले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे आगमन सात नोव्हेंबरला महाराष्ट्रात होत आहे. 18 नोव्हेंबरला ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यात येमार आहे. या दिवशीच शेगावला जाहीर सभाही होणार आहे. या सभेला लाखोंची उपस्थिती असावी, यासाठी संपूर्ण कांग्रेसची यंत्रणा कामाला लागली असून या सभेच्या तयारीसाठी नाना पटोले बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.


29 राज्यपैकी फक्त 10 राज्यातच भाजप सत्तेत


आपला पैसा मुठभर लोकांच्या घरी जात आहे. त्यामुळं काही लोकं श्रीमंत होत असल्याचे पटोले यावेळी म्हणाले. या देशासाठी, स्वत:साठी आता पेटून उठण्याची गरज आहे. देशात 29 राज्य आहेत. त्यापैकी फक्त 10 राज्यातच भाजप सत्तेत आहे. 19 राज्यात भाजप सत्तेत नाही. अनेर राज्यात त्यांना शून्य मते आहेत. केरळमध्ये त्यांचा एकच आमदार आहे. तामिळनाडूमध्ये एकही आमदार नाही. तेलंगणामध्ये चार आमदार आहेत. मिझोरामध्ये शून्य आमदार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली. पश्चिम बंगालमध्ये एवढा प्रचार करुनही तिथे त्यांचे तीनच आमदार निवडून आल्याचे पटोले म्हणाले. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पोटाचा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमची नवीन पिढीचा, आमच्या गरिबांचा आहे. म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन आपण सर्वांनी टीम वर्क करावं असे आवाहन यावेळी पटोले यांनी केलं. 


महत्त्वाच्या बातम्या:


Tata AirBus Project: शिंदे-फडणवीस सरकार गुजरातचे एजंट; नाना पटोले यांची बोचरी टीका