मुंबई : कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती पण रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. महिलांना केंद्रस्थानी ठेवत यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात महत्त्वाची तरतूद करण्यात आली. सोबतच आपत्ती वेळी निर्माण झालेली निकड लक्षात घेऊन नैसर्गिक आपत्ती च्या वेळी तत्पर मदत मिळावी म्हणूनही अर्थसंकल्पातून आवश्यक ती तरतूद राज्य सरकारकडून करण्यात आली.
नैसर्गिक आपत्ती, मदत आणि इतर अनिवार्य खर्चासाठी 11 हजार 315कोटी 78 लाख 62 हजार रुपयांची तरतूद केली असल्याचे अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.
महिला दिनी अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा; महिलेच्या नावावर घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत
2020 या वर्षात मध्ये कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ, पूर्व विदर्भात निर्माण झालेली पूरपरिस्थिती, जून ते ऑक्टोबर या काळात राज्यात झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 5 हजार सहाशे 24 कोटी रुपये मदत वितरीत करण्यात आली. या आपत्ती वेळी निर्माण झालेली निकड लक्षात घेऊन नैसर्गिक आपत्ती च्या वेळी तत्पर मदत मिळावी म्हणून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची एक तुकडी महाड जिल्हा रायगड येथे कायमस्वरूपी तैनात करण्याबाबत राज्य शासनाने केंद्र सरकारला विनंती केली आहे. असेहिअर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
2021- 22 साठी कार्यक्रम खर्चाकरिता मदत पुनवर्सन विभागास 139 कोटी प्रस्तावित असल्याची माहितीही त्यांनी दिली. शिवाय नैसर्गिक आपत्ती, मदत आणि इतर अनिवार्य खर्चासाठी 11 हजार 315कोटी 78 लाख 62 हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित असल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली.