Maharashtra Budget 2023 : राज्याचा राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामधून अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान, जाहीर करण्यात आलेल्या घोषणांमध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा योजना सामान्यांसाठी सर्वात 'आरोग्यदायी' राहिलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजना (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) संदर्भातील आहे. या योजनेतून आता पाच लाखांपर्यंत उपचार करता येणार आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य खासगी दवाखान्यातील लाखोंची बिले अदा करण्यापेक्षा या योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंत उपचार करून घेता येणार आहे. जन आरोग्य योजनेचं विमा संरक्षण दीड लाखांहून पाच लाख रुपये करण्यात आलं आहे.


या योजनेमध्ये आणखी 200 नव्या रुग्णालयांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली जाणार आहे. दुसरीकडे, मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियाचा लाभही अडीच लाखांवरून 4 लाखांपर्यंत नेण्यात आला आहे. त्यामुळे यासंदर्भात जे कोणी लाभ घेऊ इच्छित असतील किंवा जे प्रतीक्षेत आहेत त्यांना या योजनेचा लाभ होईल. 


अर्थसंकल्पातील अन्य महत्त्वपूर्ण योजना


निराधार योजनांमध्ये वाढीव अर्थसहाय्य



  • अंत्योदयाचा विचार

  •  संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये

  •  राज्य सरकार अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार

  •  प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यात नियमित प्रदान


नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 



  • प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर

  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

  • प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार

  • केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार

  • 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ

  • 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार


‘लेक लाडकी’ योजना



  • मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात

  • पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ

  • जन्मानंतर मुलीला 5000 रुपये

  • पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये

  • अकरावीत 8000 रुपये

  • मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये


महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट



  • राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिट दरात महिलांना 50 टक्के सवलत

  • चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार

  •  महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर

  •  कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर

  • मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना

  • महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण

  •  माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार


आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ



  • आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये

  • गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये

  • अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये

  • मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये

  • अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये

  • अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार

  • अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली


इतर महत्वाच्या बातम्या