Maharashtra Breaking News LIVE: वाल्मीक कराड यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई अन् दुसऱ्या दिवशीही परळी बंद!
Maharashtra Breaking News Live Updates: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
Parbhani: परभणी शहरातील वसमत रस्त्यावर असलेल्या एका वडापावच्या हातगाड्याला आग लागून गाड्यामधील 2 सिलेंडरचा स्फोट होवून शहर हादरले होते. मात्र या घटनेतील सीसीटीव्ही समोर आले असून 2 तरुणांनी या गाड्यात ज्वलनशील पदार्थ टाकुन आग लावण्यात आली होती. ज्यामुळे गाड्याने पुर्णतः पेट घेवुन गड्यातील दोन सिलेंडरचा स्फोट झाला होता. या प्रकरणात आता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून हे दोन तरुण कोण आहेत? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान अशा प्रकारे आग लावण्याची परभणीतील ही पहिलीच गंभीर घटना आहे.
पूजा खेडकरला अंतरिम दिलासा. १४ फेब्रुवारीला पुढील सुनावणी. पुढील सुनावणीपर्यंत अटक होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून खेडकरांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी झाली. त्यावेळी हा निर्णय देण्यात आला
सविस्तर बातमी वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा...
पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासाला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. याप्रकरणात विशेष तपास पथकाने (SIT) वाल्मिक कराड याच्यावर संघटित गुन्हेगारीसाठी असलेल्या मकोका कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आता संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांना घरात आसरा देणाऱ्या लोकांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा...
केज कोर्टाच्या बाहेर पोलिसांकडून विशेष खबरदारी. वाल्मिक कराडच्या रिमांडमुळे आज दुपारपर्यंत इतर प्रकरणातील पक्षकारांना प्रवेश नाही.
कोर्टाचे नियमित कामकाज सुरू मात्र फक्त वकिल आणि कर्मचाऱ्यांनाच प्रवेश. केज कोर्टात दुपारपर्यंत इतर पक्षकारांना प्रवेश नसल्याचे सुनावणीसाठी आलेल्या लोकांना पोलीस सांगत आहेत. केज कोर्टाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून प्रत्येकाची तपासणी करूनच कोर्ट आवारात सोडले जात आहे.
Beed News: परळीत वाल्मिक कराडांच्या समर्थकाचे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन. मारोती मुंडे हा तरुण गेल्या तासभरापासून टॉवरवर चढून बसला आहे. कराड याच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी. मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्येचा इशारा
परळी शहरातील अनेक दुकानं आजही उघडली नाहीत. शिरसाळा आणि धार्मापुरी या गावांमध्ये आज वाल्मीक कराड यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ बंद पाळला जात आहे.
काल वाल्मीक कराड यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर परळी शहरांमध्ये बाजारपेठ बंद झाली होती. आज परळी बंद असा कोणताही आव्हान करण्यात आले नव्हते, तरीही परळी शहरातील निम्मी बाजारपेठ आताही बंद असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पुणे जिल्ह्यातील मुळशी भागातील एका प्रसिद्ध बिर्याणी हॉटेल चोरट्यांने फोडलं. बिर्याणी खाण्यासाठी आलेल्या चोरटे सी सी टिव्हीमध्ये कैद झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार १४ जानेवारी रोजी पहाटे ३.५१ वाजता घडला. पुणे जिल्ह्यातील मुळशी भागात एक हॉटेल आहे जिथे बिर्याणी प्रसिद्ध आहे. दोन ते तीन चोरट्यांनी पहाटेच्या वेळी या हॉटेलचे शटर तोडले आणि आत प्रवेश केला.
बिर्याणी खाण्यासाठी चोरट्यांनी थेट हॉटेलच्या किचन मध्ये प्रवेश केला आणि प्रत्येक भांड्यात बिर्याणी मिळते आहे का शोधायला सुरुवात केली. या तिघांनी तोंडाला मास्क लावून संपूर्ण किचन शब्दशः उचकले. पण त्यांना एका ही भांड्यात बिर्याणीचा एक घास सुद्धा मिळाला नाही. ही संपूर्ण घटना सी सी टिव्ही मध्ये कैद झाली आहे. बिर्याणी न मिळाल्यामुळे चोरट्यांनी हॉटेल मधील चिकन लॉलीपॉप चोरले यासह तीस रुपयाची चिल्लर चोरली व कोल्ड्रिंक्स पिऊन पळ काढला.
Pune News : पुण्यानंतर वाल्मिक कराडने पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलंय. वाल्मिक बाबुराव कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावाने हा फ्लॅट आहे. काळेवाडी फाट्याजवळच्या पार्क स्ट्रीट सोसायटीतील पार्क आयवरी इमारतीत हा फोर बीएचके फ्लॅट आहे, ज्याची आजच्या बाजार भावानुसार हा फ्लॅट साडे तीन कोटींच्या किमतीचा आहे. सध्या इथं कोणी राहत नाहीये, मात्र मिळकत कर थकवल्याप्रकरणी महापालिकेने फ्लॅटच्या बाहेर नोटीस चिटकवली आहे.
Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास 15 ते 16 गावात अचानक केस गळती सुरू झाली आणि अनेकांना टक्कल पडलं. 'एबीपी माझा' ने सर्वात आधी ही बातमी जगासमोर आणली. आणि सुरू झाली आरोग्य यंत्रणेची धावाधाव. अनेक वैद्यकीय पथके या भागात केस गळतीचा शोध घेण्यासाठी येऊन गेली, मात्र वीस दिवस उलटूनही केस गळतीच्या कारणांचा अद्याप शोध लागलेला नाही. आज या परिसरात देशाच्या सर्वोच्च असलेल्या केंद्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे पथक आज पोहोचल आहे. मात्र गेल्या वीस दिवसापासून शेगाव तालुक्यातील या 15 ते 16 गावातील नागरिकांना अनेक परिणामांना सामोरे जाव लागत आहे. या गावातील व या परिसरातील नागरिकांकडे इतर परिसरातील लोक वेगळ्याच नजरेने बघायला लागले आहेत.केस गळती आणि टक्कल पडत असल्याने या परिसरात कुणी नवीन पाहूना ही येईना तर इतर गावात या परिसरातील कुणाला येऊ देईनात. लग्नाळू मुलांना मुलींना स्थळही येईना. तर ठरलेले पाहुणे सुद्धा काही कारणाने यायचं रद्द करायला लागलेत. तर कुठे या परिसरातील नागरिकांना सलून मध्ये सुद्धा प्रवेश दिला जात नाही त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे व शासनाने लवकरात लवकर या आजाराचे निदान लावून यावर तात्काळ औषध उपचार करावा व आम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढाव अशी मागणी या परिसरातील नागरिक आता करत आहेत.
Nagpur Crime News : नागपुरात एका 45 वर्षीय मानसोपचार तज्ञाला त्याच्याकडे समुपदेशनासाठी येणाऱ्या तरुणी आणि अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी मानसोपचार तज्ञ गेले अनेक वर्ष नागपुरात समुपदेशन केंद्र चालवत होता. तो नागपूरसह शेजारच्या जिल्ह्यांमध्ये त्या संदर्भातील शिबिरेही घेत होता. त्यामुळे त्याच्याकडे मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ही करियर संबंधी अडचणींबद्दल समुपदेशन घ्यायला येत होते. त्यापैकीच काही अल्पवयीन मुली आणि तरुणींचे त्याने विविध आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर आरोपी या अल्पवयीन मुली आणि तरुणींचे आक्षेपार्ह फोटो व्हिडिओही स्वतःकडे संग्रहित ठेवायचा आणि त्याच्या आधारे पुढेही त्या तरुणींना ब्लॅकमेल करायचा.
Palghar News : पालघर : पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकाजवळ प्रवाशांचा जीव धोक्यात घालून जीवघेणा प्रवास . रेल्वे ट्रॅक ओलांडू नये म्हणून लावण्यात आलेल्या रेलिंग प्रवाशांकडून धोकादायक पद्धतीने ओलांडल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस . रेलिंग ओलांडताना प्रवासी रेलिंग वरून थेट रेल्वे ट्रॅक शेजारी पडला . घटना दुसऱ्या प्रवाशाच्या कॅमेरात कैद. धोकादायक पद्धतीने रेलिंग आणि रेल्वे ट्रॅक ओलांडले जात असताना देखील रेल्वे पोलिसांचं दुर्लक्ष.
Mumbai Wether Updates : मुंबईतील तापमानात मागील दोन दिवसांपासून वाढ होऊन वातावरणातील गारठा काहीसा कमी झाला आहे. दरम्यान, मुंबईत दोन दिवस ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईतील तापमानात दोन दिवसांपासून वाढ झाली आहे. त्यामुळे गारवा कमी होऊन दिवसभर उकाडा सहन करावा लागत आहे. आज सकाळी मुंबईत ढगाळ वातावरण आणि धुक्याची धूसर चादर पसरलेली पाह्याला मिळत आहे, तर दव पडल्यानं रस्ते ही ओले आहेत.
Worli Hit And Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून पक्षपाती आणि निष्काळजीपणानं केल्याचा आरोप
कावेरी नाखवा यांचे पती प्रदीप यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103 अंतर्गत गुन्हा नोंदवत अतिरिक्त आरोपपत्र दाखल करावं अशी याचिकेतून मागणी
हायकोर्टाने याची दखल घेत मुंबई पोलिसांना नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत
शिवसेना शिंदे गटाचे उपनेता राजेश शहाचा यांचा मुलगा मिहिर व त्यांचा ड्रायव्हर मुख्य आरोपी
7 जुलै 2024 रोजी दारूच्या नशेत बीएमडब्ल्यू कार बेदरकारपणे चालवत वरळी परिसरात कावेरी नाखवा यांना पहाटेच्यावेळी कारखाली चिरडले
त्याच अवस्थेत नाखवा यांना कारखाली वांद्रे-वरळी सागरी सेतूपर्यंत फरफटत नेलं
याप्रकरणी पोलिसांनी फरार मिहीर शहाला अटक करत त्याच्या विरोधात विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला
मात्र आरोपपत्रात त्रुटी असल्याचा दावा करत नाखवा कुटुंबियांची हायकोर्टात याचिका
Beed News : वाल्मिक कराडला आज केज कोर्टात करणार हजर
कराडवर काल मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल, आज कोर्टात
देशमुख हत्या प्रकरणात कराडच्या सहभागाचा ठपका ठेवत मकोका
मकोका दाखल झाल्याने काल परळीत तणाव, कराड समर्थक आक्रमक
आज परळीत तणावपूर्ण शांतता, परिस्थिती संवेदनशील
परळीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार महायुतीच्या आमदारांची बैठक
नौदलाच्या सोहळ्यानंतर मुंबईत मोदी घेणार महायुतीच्या आमदारांची बैठक
मुंबईत आंग्रे सभागृहात पंतप्रधानांची आमदारांसह बैठक
महायुतीच्या आमदारांना पंतप्रधान करणार मार्गदर्शन
सकाळी ८.३० वा. महायुतीचे आमदार विधान भवनाकडून कार्यक्रमस्थळी
बैठकीच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत शिवसेना आमदारांची बैठक
पंतप्रधानांच्या बैठकीसह मनपा निवडणुका, सदस्य नोंदणी यावर चर्चा
PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज मुंबईत नौदलाच्या दोन युद्धनौका आणि एक पाणबुडी ताफ्यात सामील होतील. एकाच वेळी दोन युद्धनौका आणि एक पाणबुडी ताफ्यात सामील करण्याची इतिहासातली ही पहिलीच वेळ आहे. आयएनएस सुरत, आयएनएस नीलगिरी या दोन युद्धनौका आणि आयएनएस वागशीर ही पाणबुडी आज नौदलाच्या ताफ्यात सहभागी होईल. पंतप्रधान मोदी नौदलाच्या या शानदार कार्यक्रमानंतर नवी मुंबईत खारघर इथे उभारलेल्या भव्य इस्कॉन मंदिराचं उदघाटन करणार आहेत. तब्बल 9 एकरांवर हे भव्य मंदिर उभं आहे. सकाळी पावणे दहाच्या सुमाराला पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल होतील. नौदलाचा प्रस्तावित कार्यक्रम सकाळी साडेदहा वाजता आहे. त्यानंतर दुपारी ते नवी मुंबईत मंदिराचं उद्धाटन करणार आहेत.
Maharashtra News : राज्यात एकीकडे वाघांची संख्या वाढत असताना मागच्या अवघ्या 14 दिवसांत सहा वाघ मृत्यूमुखी पडले.
2023च्या तुलनेत 2024 मध्ये राज्यात वाघांच्या मृत्यूचा आलेख 50 टक्क्यांनी खाली होता. मात्र, आता पुन्हा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वाघांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, अभयारण्य किंवा व्याघ्रप्रकल्पाच्या बाहेर हे मृत्यू झाले आहेत. यातील काही मृत्यू संशयास्पद आहेत.
यवतमाळच्या घटनेत वाघाचे दात आणि नखे गायब आहेत. तर भंडाऱ्याच्या प्रकरणात चक्क वाघाचे तुकडे सापडले. दरम्यान, या पाच वाघांपैकी दोन मृत्यू हे अवघ्या पाच ते सहा महिन्यांच्या बछड्यांचे आहेत.
PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई, नवी मुंबईत दौऱ्यावर असून ते महायुतीच्या आमदारांशी बैठकीत संवाद साधणार आहेत.
मोदी यांच्या हस्ते ‘आयएनएस सूरत’, ‘आयएनएस निलगिरी’ या युद्धनौकांचे आणि ‘आयएनएस वाघशीर’ या पाणबुडीचे सकाळी साडेदहा वाजता जलावतरण होईल.
जलावतरण झाल्यानंतर आमदारांची बैठक पार पडेल…
दुपारी साडेतीन वाजता खारघर येथे ‘इस्कॉन’ मंदिराचे उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
दोन युद्धनौका आणि एका पाणबुडीचे एकाचवेळी जलावतरण आज पंतप्रधानाच्या हस्ते होणार आहे…
यात ‘आयएनएस’ सूरत ही सर्वांत मोठी आणि अत्याधुनिक विनाशिका आहे. ही क्षेपणास्त्रवाहू (पी15बी गाईडेड मिसाईल) प्रकल्पातील चौथी आणि शेवटची विनाशिका आहे. यामध्ये 75 टक्के तंत्रज्ञान स्वदेशी आहे.
‘आयएनएस निलगिरी’ ही (पी17ए स्टेल्थ फ्रिगेट) या अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रकल्पातील पहिली युद्धनौका आहे.
‘आयएनएस वाघशीर’ ही (पी75 स्कॉर्पियन) प्रकल्पातील सहावी पाणबुडी आहे.
Mumbai-Nashik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावर नवली ब्रिजवर भीषण अपघात झालेला असून त्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातस्थळी जीव रक्षक दलचे शहापुरचे सर्वेसर्वा समीर चौधरी आणि त्याचे सहकारी मदतकार्य करत आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. टोरेस गैरव्यवहार प्रकरणी (Torres Scam) अखेर ईडीने गुन्हा दाखल करत तपासल सुरुवात केली, असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच राज्यात थंडीच्या कडाका वाढणार असून पुढील काही दिवसात तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -