Maharashtra Breaking News Live Updates: राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live Updates: राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

मुकेश चव्हाण Last Updated: 17 Jan 2025 02:57 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. आंबेडकरी अनुयायांचा आज परभणी ते मुंबई लाँग मार्च निघणार आहे. सोमनाथ सूर्यवंशींच्या आरोपींवर कारवाई न झाल्यानं आंबेडकरी अनुयायी आक्रमक...More

नांदेडचा बीड करायचा नाही, पालकमंत्री म्हणून मुंडे बंधू नकोत; सकल मराठा समाजाची मागणी 

नांदेड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये 18 जानेवारीला मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.  आता हा मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाने आज पत्रकार परिषदेत दिली आहे. आता पर्यंतची मागणी होती त्या मागण्या पूर्ण होत आहे. तपासावर आम्ही समाधानी आहोत. त्यामुळे मोर्चा हा स्थगित केला आहे. तसेच नांदेडचा पालकमंत्री मुंडे बंधू नको, जर नांदेडला पालकमंत्री मुंडे बंधू दिलेत तर इथला गोर गरीब समाज रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा देखील सकल मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.