Maharashtra Breaking News LIVE Updates: स्वारगेट अत्याचार प्रकरणात 15 दिवसांत आरोपपत्र सादर होणार

Maharashtra Breaking News LIVE Updates: सध्या राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन मुंबईत सुरु आहे. या राज्यातील या घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...

मुकेश चव्हाण Last Updated: 05 Mar 2025 02:05 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates: अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यानंतर आता बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झालेले कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यावरही राजीनाम्यासाठी...More

दापोली विधानसभा मतदारसंघातील उध्दव गटाला धक्का? माजी आमदार संजय कदम शिवसेनेच्या वाटेवर

दापोली विधानसभा मतदारसंघातील उध्दव गटाचे माजी आमदार संजय कदम शिवसेनेच्या वाटेवर.


शिवसेनेचे नेते रामदास कदम  आणि संजय कदम यांची मुंबईतील बैठकीत संजय कदम यांची ठरली पक्षांतराची भूमिका.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय कदम यांच्या मुंबईत लवकरच पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पडणार पार.


रामदास कदम यांच्या पालखी बंगल्यावर संजय कदम आणि रामदास कदम यांचे एकत्रित स्नेहभोजन - सूत्रांची माहिती


संजय कदम हे दापोली विधानसभा मतदार संघाचे उध्दव गटाचे पराभूत उमेदवार.


राजन साळवीनंतर आणखी एक नेते उध्दव ठाकरेंची सोडणार साथ.