Maharashtra News Live Updates: नारायण राणेंचे एमआयएमचे उमेदवार नासीर सिद्दीकी यांना प्रत्युत्तर
Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
नारायण राणेंचे एमआयएमचे उमेदवार नासीर सिद्दीकी यांना प्रत्युत्तर
नितेश राणेंना घुसून मारण्याची भाषा करणाऱ्यांचे पाय कलम केले जातील
‘निजामशाहीच्या पाठीराख्यांचे लांगुलचालन करणारे हे सरकार नाही’
बहुसंख्यांचे हितरक्षण करणारे हे सरकार आहे
नितेश राणे व हिंदूंविरोधात गरळ ओकू नका
विधानभवनाकडे वळण्याआधीच पाय कलम केले जातील
नारायण राणेंची नासीर सिद्दीकी यांना थेट धमकी
1999 साली महान संत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जन्म घेतला. यानंतर जातीयवाड्याची पाळेमुळे खोलवर रुजली, अशी टीका राज ठाकरेंनी केली. तसेच मागील 40 वर्षांपासून राजकारणात संधी मिळालेले शरद पवार यांनी बारामती तालुक्यात अनेक उद्योगधंदे आणले. मात्र त्यांनी उर्वरित महाराष्ट्राचा कधी विचार केला नाही. मराठवाड्यात उद्योगधंदे नाहीत, विदर्भात नाहीत, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी शरद पवारांवर केला.
विधानसभा निवडणुकीतील भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली. दरम्यान ही भूमिका स्पष्ट केल्यानंतर आज पासून जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातून दौऱ्याला सुरुवात केलीय. गेवराई तालुक्यातील त्वरिता देवीचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांच्या दौऱ्याला सुरुवात झालीय.
लाडकी बहिण योजने संदर्भात बहिणींना दीड हजर नाही तर तबल 2100 रुपये देण्यात येणार
सोबत महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलिस दलात समावेश करण्याचा वादा करण्यात आला आहे
यात धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजर रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे
तर ग्रामीण भागात 45000 पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेतीपिकांच्या msp वर 20%अनुदान देण्याचा वादा करण्यात आला आहे
वीज बिलात 30% कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा करण्यात आला आहे
वृद्ध पेन्शन धारकांना आता पंधराशे वरुण महिन्याला 2100 रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे
दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतनाचा वादा
25 लाख रोजगार निर्मितीचा वादा
लाडकी बहीणचे पैसे 2100 रुपये करणार असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जाहीरनाम्यात सांगण्यात आलं आहे.
अमेरिकेतील राष्ठ्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प आघाडीवर
अमेरिकेतील निकालामुळे भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण
सेंसेक्स 480 अंकांनी वधारला तर निफ्टीमध्ये 150 अंकांची वाढ
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरात आयकर विभागाची छापेमारी
वैजापूर तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब संचेती यांच्या घरी छापेमारी
बाळासाहेब संचेती वैजापूर को-ऑपरेटिव्ह मर्चंट बँकेचे संचालक आहेत
ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार दिनेश परदेशी यांचे निकटवर्तीय
दिवाळी सण आणि शाळेला सुट्या असल्याने तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेली दोन दिवसापासून भाविकांनी मोठी गर्दी केलीय.दीवाळी निमीत्त मोठ्या शहरातुन गावी आलेले भाविक सहकुटूंब तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत असल्याने तुळजापुरात भाविकांचा जनसागर पाहयला मिळत आहे मंदिर परिसर आणि शहरातील रस्त्यावर गर्दी झाल्याचं दिसत आहे दरम्यान भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने काटेकोर नियोजन केले जात असल्याची माहिती मंदीर संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
मुंबई जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपच्या मुंबईत दोन मोठ्या सभा
बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या घाटकोपर आणि बोरिवलीमध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्या सभा
घाटकोपरच्या जनरल अरुणकुमार वैद्य मैदानात तर बोरिवलीच्या सप्ताह मैदानात भाजपकडून विजयी शंखनाद सभेचे आयोजन
मुंबईतील सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपकडून तयारी
मुंबईत भाजप १८ जागांवर निवडणूक लढवत आहे
महायुतीच्या प्रचारासाठी भाजपचे वरिष्ठ नेते मैदानात
अमित शाह उद्या आणि परवा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर
इचलकरंजी, इस्लामपूर आणि जत आटपाडीच्या परिसरात होणार अमित शाह यांच्या सभा
भाजप खासदार धनंजय महाडिक यांची माहिती
अजित पवारांची साथ सोडून पुन्हा शरद पवारांकडे गेलेले मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
नरेंद्र राणे यांच्या सोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी विलास माने, दिनकर तावडे आणि विजय देसाई यांचा देखील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश
दुपारी १२ वाजता सिल्वर ओक निवासस्थानी पक्ष प्रवेश पार पडणार
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून ४५ सदस्यांची प्रचार समिती स्थापन…
काँग्रेसचे जेष्ठ नेते चंद्रकांत हंडोरे हे या समितीचे अध्यक्ष आहे. तर काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांना समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली.
भाजप कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि मनधरणीसाठी रवींद्र चव्हाण कोकणात
आजपासून तीन दिवस रवींद्र चव्हाण यांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा
महायुती म्हणून काम करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी साधारण संवाद
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आठ पैकी केवळ एकाच जागेवर भाजपचा उमेदवार
जागा वाटपात अपेक्षित जागा न मिळाल्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
बाबा सिद्धीकी यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला धमकीचा फोन
लाॅरेन्स बिष्णोई गॅगकडून धमकी आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज
खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांना काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीकडून आला होता फोन
फोनवरील व्यक्तीने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांना फोन करून ५ कोटीसाठी धमकावले आहे
पैसे न दिल्यास प्रत्यक्षदर्शी साक्षीदारालाही जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
डाॅलरच्या तुलनेत रुपया गडगडला
डाॅलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक निचांकी पातळी
अमेरिकाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डाॅलरच्या तुलनेत रुपया ८४.१७ पर्यंत खाली उतरला
अमेरीकेत मतमोजणीला सुरुवात झाली असताना भारतीय भांडवली बाजारात देखील परिणाम
सेन्सेक्स २९५ अंकांनी वधारला तर निफ्टी ९५ अंकांनी वर
७ स्विंग स्टेटचे निकाल धक्कादायक ७ राज्य मिळून एकूण ९३ मतं
१५ इलेक्ट्रोल मतं कमला हैरिस यांना तर उरलेली सर्व ७८ मतं ट्रम्प यांच्या पारड्यात
मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात ट्रम्प यांची मोठी आघाडी
पाच वर्षात निधी न मिळालेले गाव दाखवा आणि एक लाख रुपये जिंका, तानाजी सावंत यांची खुली ऑफर
परंडा विधानसभा मतदारसंघात पाच वर्षात प्रत्येक गावात विकास निधी दिल्याचा दावा
परंडा विधानसभा मतदारसंघात तानाजी सावंत पुन्हा मैदानात , गाव भेटी दौरा सुरू
विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान सावंत यांनी केलेले या वक्तव्याची चर्चा
महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे यांच्याशी सावंत यांची थेट लढत
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प आघाडीवर, १५ राज्यांमध्ये ट्रम्प यांचा विजय आणि ६ राज्यांत आघाडी तर कमला हॅरिस यांचा ९ राज्यात विजय आणि ७ राज्यांत आघाडी, विजयासाठी २७० इलेक्टोरल मतांची आवश्यकता
डोनल्ड ट्रम्प - इंडियाना, केंटकी, साऊथ कॅरोलिना, फ्लोरिडा, अलाबामा, मिसुरी, ओक्लाहोमा, टेनेसी, इलिनॉय, मिसिसिपी, टेक्सस, अरकान्सा, नेब्रास्का, नॉर्थ डेकोटा, साऊथ डेकोटा, ल्युसियाना, व्योमिंग, कॅन्सास, ओहायो, नॉर्थ कॅरोलिना, जॉर्जिया,
कमला हॅरीस - वरमाँट, न्यूयॉर्क, पेनसिल्विनिया, डेलावेअर, कोलोरॅडो, मिशिगन, विसकॉन्सिन, न्यू हॅम्पशिअर,
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभांची करणार 'हाफ सेंन्चुरी'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील १२ दिवसात ४८ सभा करणार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवसाला ४ सभांचे वेळापत्र मुख्यमंत्र्यांचे आखण्यात आले आहे
या १२ दिवसात महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री महाराष्ट्र पिंजून काढणार
विदर्भ, मराठवाडा, कोकण,पश्चिम महाराष्ट्रासह खानदेशात या सभा होणार आहेत
मुंबईच्या अंधेरी पूर्व येथून मुख्यमंत्र्यांनी प्रचाराचा नारळ फोडत सभांना सुरूवात केली होती
मुख्यमंत्र्यांच्या वेळापत्रकानुसार शेवटची सभा ही मुंबई तसेच ठाण्यात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे
मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या दुर्गम गावात बुलढाणा पोलिसांची मोठी कारवाई.
दोन एकर शेतात लावलेलं ४ कोटी ५१ लाख रुपयांचे गांजाच पीक जप्त , एक जण अटकेत.
आमचे 10 आमदार आल्यावर ना ठाकरे ,ना शिंदे , ना पवार, कुणीच सत्तेवर बसू शकत नाही, असेही अकबरुद्दीन ओवेसी यांनी म्हटले. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
बंडखोरी करणाऱ्यांची अखेर भाजपकडून हाकालपट्टी
भाजपमध्ये बंडखोरी केलेल्या 40 जणांवर पक्षाची कारवाई
पक्षाने सांगूनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने अखेर पक्षाकडून हाकालपट्टी
सावंतवाडी विशाल परब, श्रीगोंदा सुवर्णा पाचपुते, अक्कल कोट सुनील बंडगर, अमरावती जगदीश गुप्ता, साकोली सोमदत्त करंजकर, सोलापूर शहर उत्तर शोभा बनशेट्टी यांच्यासह एकूण 40 जणांवर पक्षाची कारवाई
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाली असून किमान तापमान काही अंशाने घसरले आहे. यामुळे दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडीचा लपंडाव मुंबईकरांना अनुभवास मिळत आहे. त्यातच थंडीची चाहूल लागली असून काही दिवसांत थंडीचे आगमन होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. मुंबईत आज कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यातच आर्द्रता वाढल्याने मुंबईकरांना उकाडाह सहन करावा लागला. त्यातच रात्रीच्या किमान तापमानात घसरण झाली असून ते २२ अंशांपर्यंत खाली गेले आहे. पुढील आठ ते दहा दिवस ही स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र थंडीचा जोर हळूहळू वाढणार आहे. कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. तर, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६ अंश सेल्सिअस आणि २२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
वाशिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे पदाधिकारी नागेश घोपे यांनी भाजपचे उमेदवार शाम खोडे यांच्या विरोधात बंडखोरी केल्याने त्यांच्या पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे...घोपे जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहे..
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा महाराष्ट्र दौरा, वाशिम, अमरावती, अकोला जिल्ह्यात सभा
मुख्यमंत्री शिंदेंची आज दुपारी १ वाजता टीप टॉप प्लाझा इथे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बैठक, ठाण्यातल्या चार मतदारसंघांच्या रणनीतीवर चर्चा
देवेंद्र फडणवीसांचा आज पश्चिम महाराष्ट्र दौरा, सांगली जिल्ह्यात जत, सातार जिल्ह्यात कराडमध्ये, तर पुणे जिल्ह्यात चिंचवडमध्ये फडणवीसांच्या प्रचारसभा
मोहम्मद पैगंबर बिल विधिमंडळात मंजूर करू, प्रकाश आंबेडकरांकडून वंचितच्या जाहीरनाम्यात घोषणा, महिलांना प्रतिमहिना साडे तीन हजारांचं वेतन देण्याचं आश्वासन
राज्यात २५ हजार महिलांची पोलीस भरती, लाडक्या बहिणींना प्रतिमहिना २१०० रुपये, २५ लाख रोजगार निर्मिती तर शेतकरी सन्मान निधी १५ हजारांवर...कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांकडून १० मोठ्या घोषणा
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार, बारामतीत अजित पवार, मुंबईत प्रदेशाध्यक्ष तटकरे तर गोंदियात प्रफुल पटेल करणार जाहीरनामा सादर
महाविकास आघाडीचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार, बीकेसीत महाराष्ट्र स्वाभिमान सभेत राहुल गांधी, पवार, ठाकरेंच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं प्रकाशन
काँग्रेस अध्यक्ष खरगे आणि राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, राहुल गांधी दीक्षाभूमीचं घेणार दर्शन, नागपुरात संविधान सभा, संध्याकाळी मुंबईत मविआची प्रचारसभा
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प आघाडीवर, इंडियाना, केंटुकी, वेस्ट व्हर्जिनिआ राज्यात ट्रम्प यांचा विजय, तर व्हरमाँटमध्ये कमला हॅरिस यांचा विजय, विजयासाठी २७० इलेक्टोरल मतांची आवश्यकता
खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या ४५ स्टार प्रचारकांची यादी जाहीर
विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर
पार्श्वभूमी
मुंबई: राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच मतदारसंघांत कोणा-कोणामध्ये लढत होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. आता राज्यभरात मोठ्या ताकदीने प्रचाराला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आज राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल देखील आज येणार आहे. या सर्व घडामोडींचे तसेच इतरही महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -