Maharashtra Breaking 5th August LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra Breaking 5th August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 05 Aug 2024 07:51 AM
Nashik Rains : गिरणा नदीच्या पुरात अडकलेल्या 12 जणांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू

Nashik Rains : गिरणा नदीच्या पुरात अडकलेल्या 12 जणांना वाचविण्यासाठी धुळे येथून एस.डी.आर.एफ.ची टीम रात्री घटनास्थळी दाखल असून अंधारामुळे बचाव कार्य थांबविण्यात आले होते. सकाळी अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यास सुरुवात करण्यात आली..मात्र पुराच्या पाण्यात वाढ झाली असल्याने  बचाव कार्यात अडचणी येत आहे..त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी कमी होताच पुन्हा बचाव कार्य सुरु केले जाणार आहे. दरम्यान, मासे पकडण्यासाठी गेलेले व पाण्यात अडकलेले सर्वजण एका उंच खडकावर असल्यामुळे सुखरूप आहे. मागील 12 ते 14 तासांपासून ते अडकून पडले आहेत..संपूर्ण रात्र त्यांना खडकावर बसून काढावी लागली.

Nashik Rains : सुरगाण्याच्या देवमाळ ते उंबरदे पुल पाण्याखाली

Nashik Rains : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पावसाने थैमान घातले असून, देवमाळ ते अंबडदहाड नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. दळणवळणाची सोय बंद झाली आहे.शाळकरी मुलांना शाळेत जाणं अशक्य झाले. दवाखान्याची सोय नसल्या कारणाने गर्भवती महिला, आजारी ग्रामस्थ यांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून जीव धोक्यात टाकून नदी ओलांडावी लागत असते. ही जीवघेणी कसरत नागरिकांच्या जीवावर बेतात शक्यता असून सदर पुलाची उंची वाढविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Dhule News : धुळ्यात मुसळधार पाऊस, अक्कलपाडा धरणात पाण्याचा साठा वाढला

Dhule News : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणे प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून अक्कलपाडा धरण्यात पाण्याचा साठा वाढला आहे यामुळे अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीत 6 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून नदीला पूर येण्याची शक्यता आहे त्यासाठी नदी व नाल्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून स्थलांतरणाची आवश्यकता भासल्यास पर्याय व्यवस्था सज्ज ठेवण्यात आले आहे, तसेच आपत्कालीन पथकांनी सर्व साहित्य व साधनं सह अलर्ट राहण्याच्या सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे शिंदखेडा तालुक्यातील बुराई मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असून बुराई धरण 90 टक्के क्षमतेने भरले आहे यामुळे शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे

Shravani Somvar 2024 : कोकणातील मार्लेश्वर देवस्थानी श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची गर्दी

Shravani Somvar 2024 : कोकणातील मार्लेश्वर या प्रसिद्ध अशा देवस्थानी श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची गर्दी झालेली आहे. पहिला श्रावण सोमवार असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक अगदी पहाटेपासून दाखल होत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावापासून काही अंतरावर उंच उंच डोंगर रांगांमध्ये हे मार्लेश्वरचं देवस्थान वसलेलं आहे. हर हर महादेव असा जयघोष करत भाविक या ठिकाणी दाखल होत आहेत.


 डोंगर रांगांच्या कडेकपाऱ्यांमधून कोसळणारे छोटे-मोठे धबधबे, धुक्याची पसरलेली दाट चादर, हिरवागार परिसर आणि पावसाच्या बरसणाऱ्या सरी हे वातावरण अल्हाददायी असं असतं. त्यामुळे देवाचे दर्शन घेतल्यानंतर त्याच्या चरणी लीन झाल्यानंतर इथल्या निसर्गाच्या आणि त्यात देखील भावीक रमून जातो.
Ahmednagar Politics : शिवाजी कर्डीले श्रीगोंदा मतदारसंघातून निवडणूक लढवणार?

Ahmednagar Politics : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राहुरी आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघावर दावा असणाऱ्या माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी यावर प्रतिक्रिया दिलीये लोकशाही आहे त्यामुळे लोकशाहीत प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे , मात्र याबाबत पक्ष निर्णय घेईल असं शिवाजी कर्डीले यांनी म्हंटलंय. तर शिवाजी कर्डीले हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशीही चर्चा सुरू आहे, त्याबाबत विचारले असता पक्षाने आदेश दिल्यास कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे. मला पैलवानकीचा छंद आहे, त्यामुळे पैलवानाला बाराही महिने व्यायाम करावा लागतो तरच तो फडात यशस्वी होतो. तसेच मी एक निवडणूक संपली की पुढच्या निवडणुकीची तयारी करतो असंही कर्डीले म्हणाले. दरम्यान, श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे बबनराव पाचपुते हे आमदार आहेत. याच मतदारसंघातून शिवाजी कर्डीले यांचं नाव समोर येत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय.

Nashik Rains : मुसळधार पावसामुळे दिंडोरीच्या पुणेगाव धरणात 80 टक्के जलसाठा

Nashik Rains : नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे दिंडोरीच्या पुणेगाव धरणात 80 टक्के जलसाठा झाल्याने धरणातून 300 क्यूसेस पाण्याचा विसर्ग नदी पात्रात करण्यात आला आहे.. हे पाणी आता ओझरखेड धरणात पोहचत आहे. एकूणच दिंडोरी तालुक्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे वाघाड, तिसगाव, पालखेड ही धरणे 'ओव्हरफ्लो' होण्याच्या मार्गावर आहे.

Nashik Rain News: दोन दिवसांपासून कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस; धनोली धरण 'ओव्हरफ्लो'

Nashik News: मागील दोन दिवसांपासून कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस सुरू असून या पावसामुळे धनोली धरण पूर्णपणे भरले असून 'ओव्हरफ्लो' झाले आहे. त्यामुळे सांडव्या मार्गे नदीला पूर आला आहे. तसेच, नदीकाठी असलेली भात आणि सोयाबीनचे पिके यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धनोली ते शेपू पाडा या परिसरातील नदीकाठच्या सुमारे 40 ते 50 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या परिसरात पावसाचा जोर वाढत असून नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Ahmednagar Updates : चार वर्षांच्या चिमुकल्याचा हौदात पडून दुर्दैवी मृत्यू


Ahmednagar News : अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागात चार वर्षीय समर शेख या चिमुकल्याचा हौदात पडून दुर्दैवी  मृत्यू झालाय. खेळता खेळता कुचकामी झाकणामुळे समर शेख हा चिमुकला हौदात पडला. ही संपूर्ण घटना  CCTV कॅमेरात कैद झालीये. काल संध्याकाळी पाच  वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मुलगा सापडत नसल्याने cctv पाहिल्यानंतर रात्री उशिरा मुलगा हौदात मृत अवस्थेत आढळून आला. तब्ब्ल 5 तासांनी 4 वर्षीय समरचा मृतदेह हौदातुन बाहेर काढण्यात आला. दरम्यान, हौदाचे झाकण न बसविणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


Maharashtra News : मुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा तूर्तास लांबणीवर; आज मुख्यमंत्री पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर असणार

Maharashtra News : राज्यातील पाऊस आणि काही भागातील पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा तूर्तास लांबणीवर. राज्यातील आपत्कालीन व्यवस्था आणि मदतकार्याबाबत मुख्यमंत्री संबंधित अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात. उद्या पूर परिस्थिती पाहणीसाठी मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर जाणार. राज्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आल्यावर मुख्यमंत्री करणार दिल्ली दौरा

Parbhani News : खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू; परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटना

Parbhani News: एका महिन्याखाली पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलीय.रामु शुक्ला बामने हा 28 वर्षीय तरुण पत्नीसह शेतमजूर म्हणुन सोनपेठ तालुक्यात कामाला होता 1 महिन्यापूर्वी त्याला पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती सध्या तो न्यायालयीन कोठडीत होता 31 जुलै रोजी त्याला कावीळ झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र आज त्याचा मृतदेह अस्थिव्यंग रुग्णालयात संशयास्पद रित्या सापडलाय या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली असुन या मृतदेहाची उत्तरीय तपासणी न्यायाधीशांच्या समोर केली जाणार आहे त्यानंतर नेमका याचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल असे अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी सांगितले आहे.

Chandrapur News : लागोपाठ हल्ल्यानं चिमूर तालुक्यातील गरडपार आणि उरकूडपार गावात वाघाची दहशत, वाघाच्या हल्ल्यात 4 जण जखमी

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने लागोपाठ केलेल्या हल्ल्याने चिमूर तालुक्यातील गरडपार आणि उरकूडपार गावात वाघाची दहशत पसरली आहे. या वाघाच्या हल्ल्यात 4 जण जखमी झाले असून जखमींवर चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. दुपारच्या दरम्यान वाघाने गरडपार येथे शेतात काम करणाऱ्या कवडू सावसागडे आणि बालाजी नन्नावरे या शेतकऱ्यांना हल्ला करून जखमी केलं. त्या नंतर वाघाने जवळच असलेल्या उरकूडपार गावाकडे आपला मोर्चा वळवून वनविभागाच्या नर्सरीत काम करणाऱ्या बाबाराव दडमल आणि दामोधर नन्नावरे या शेतकऱ्याला जखमी केलं. वाघाच्या या हल्ल्यांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रभावित गावांमध्ये दाखल झाले आहेत. 


 

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking 5th August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


1. मुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा तूर्तास लांबणीवर. आज मुख्यमंत्री पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर असणार. 


2. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज सोलापूर दौ-यावर. सोलापुराच्या शासकीय विश्रामगृह येथे राज ठाकरे सकाळी 10 पासून घेणार पदाधिकाऱ्यांची बैठक.


3. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा आज अमरावतीला. दर्यापूर येथे आंबेडकरांची सभा पार पडणार 


4.  उद्धव ठाकरेंचा सहा ते आठ ऑगस्ट दिल्ली दौरा असणार. दिल्लीत ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार. विधानसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत
चर्चा होण्याची शक्यता. 


5. 'श्रावणात एसटीसंगे तीर्थाटन' उपक्रम आजपासून सुरु होणार, यामाध्यमातून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोफत तीर्थाटनाचा आनंद घेता येणार, श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी एसटी महामंडळाचा अभिनव उपक्रम

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.