Maharashtra Breaking LIVE 25 th August: पुण्यातील खडकी भागात भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू तर एकूण 6 जण गंभीर जखमी 

Maharashtra Breaking 25 th August 2024 Marathi News LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहा फक्त एबीपी माझावर...

प्रज्वल ढगे Last Updated: 25 Aug 2024 12:12 PM
Pune Acciedent : पुण्यातील खडकी भागात भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू तर एकूण 6 जण गंभीर जखमी 

पुण्यातील खडकी भागात भीषण अपघात 


अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू तर एकूण ६ जण गंभीर जखमी 


आज सकाळी ९ वाजता घडला अपघात 


पुण्यातील खडकी भागात आज सकाळी एसटी बसने दिली चार चाकीला धडक 


जखमींना जवळच्या रुग्णालय करण्यात आलं उपचारासाठी दाखल 


बस वरील नियंत्रण सुटल्याने बस चालकाकडून घडला अपघात

साताऱ्यातील एका 17 वर्षाच्या मुलीची आत्महत्या, प्रेमप्रकरणातून मुलगा त्रास देत होता अशी कुटुंबीयांची तक्रार

साताऱ्यातील एका 17 वर्षाच्या मुलीची आत्महत्या 


प्रेमप्रकरणातून मुलगा त्रास देत होता अशी कुटुंबीयांची तक्रार


मुलगा दुसऱ्या समाजातील असल्यामुळे साताऱ्यातील पोवईनाका येथे कुटुंब रस्त्यावर  


संबंधित युवकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अजित पवार गटातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला

- अजित पवारांचे शिलेदार जुन्नरचे आमदार अतुल बेनके पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला...


- आज शरद पवार हे उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुका दौऱ्यावर आहेत...


- शरद पवारांचा जुन्नर तालुक्यातील दौरा सुरू असताना कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी भेट घेतली असून जुन्नरच्या राजकारणात ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे...

Amravati Bus Accident : अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात

अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात...


नांदगाव पेठ टोल नाक्याजवळील रिलायन्स पेट्रोल पंप जवळील घटना...


नागपूर वरून अकोला जाणारी बस झाली पलटी..


25 पेक्षा अधिक प्रवाशी जखमी.. एका प्रवाशाचा मृत्यू..


गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात झाला अपघात..


अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा..

Jayant Patil : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयंत पाटील साताऱ्यातील भाजप नेत्याच्या घरी, बंद दाराआड चर्चा

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयंत पाटील साताऱ्यातील भाजप नेत्याच्या घरी


साताऱ्यातील भाजपचे नेते मदन भोसलेंच्या घरी जयंत पाटील


मदन भोसले साताऱ्यातील  वाई मतदारसंघातील भाजपचे नेते


मदन भोसलेंच्या घरात एकतासापेक्षा जास्त वेळ बंद दाराआड चर्चा


जयंत पाटील आणि मदन भोसलेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा

बिद्री सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचे आकस्मित निधन, हसन मुश्रीफ यांना शोक अनावर

कोल्हापूर : बिद्री सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचे आकस्मित निधन 


मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक म्हणून फराकटे यांची ओळख 


फराकटे यांच्या निधनानंतर मुश्रीफ यांना शोक अनावर

नरेंद्र मोदी छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर येणार, अंबादास दानवे यांच्या नेतृत्त्वात काळे कपडे घालून आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर येणार आहेत. 


याच पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आंदोलन केले जात आहे.


विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन चालू आहे


विमानतळासमोर मानवी साखळी करून आंदोलन करण्यात येत आहे


बदलापूच्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन चालू आहे


 

Palghar Crime : पालघरच्या तारापूरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, घरात बोलवत केले अश्लील कृत्य

पालघर - पालघरच्या तारापूरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग


शेजारी राहणाऱ्या 42 वर्षीय आरोपीने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलवत केले अश्लील चाळे


तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


42 वर्षीय आरोपीला तारापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या


आरोपी मूळचा जव्हारमधील रहिवासी असल्याची पोलिसांची माहिती


आरोपीला आज न्यायालयात केलं जाणार हजर

कोलकाता येथील डॉक्टरप्रमाणे हाल करण्याची डॉक्टरला धमकी, मानखुर्दच्या साठेनगर येथील धक्कादायक प्रकार

कोलकाता येथील डॉक्टर प्रमाणे हाल करण्याची डॉक्टरला धमकी 


मानखुर्दच्या साठे नगर येथील धक्कादायक प्रकार


क्लिनिक समोर दुचाकी पार्क करण्यावरून झाला होता वाद 


वादात महिला डॉक्टरला शिविगळीसह करण्यात आली मारहाण 


क्लिनिक जाळून टाकण्याची देखील दिली धमकी 


तरुणासह तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल

Palghar Rain Update : पालघर जिल्ह्यात आज पुन्हा पहाटे पासून पावसाची संततधार

पालघर जिल्ह्यात आज पुन्हा पहाटे पासून पावसाची संततधार सुरूच असून धरण क्षेत्रात ही चांगला पाऊस होत आहे. धामणी धरण पूर्ण क्षमतेने भरल असून धरणाचे तीन दरवाजे 50 सेंटिमीटर ने उघडण्यात आले आहेत. धामणी आणि कवडास या दोन्ही धरणातून 15000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत करण्यात आला आहे. त्यामुळे सूर्या नदीलाही पूर आला आहे.

Sindhudurg Rain Updates : सिंधुदुर्गात रातभर मुसळधार पावसाने झोडपल, आज यलो अलर्ट जारी

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात दोन दिवस मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला रातभर मुसळधार पावसाने झोडपून काढलं. त्यामुळे जिल्हातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सध्या जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने समुद्रात मासेमारीसाठी मच्छीमारांनी जाऊ नये असं आव्हाहन प्रशासनाने केलं आहे.

Pune Rain Updates : खडकवासला धरण साखळी क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरूच, मुठा नदीपात्रात 35 हजार 310 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

पुणे : खडकवासला धरण साखळी क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरूच 


खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 35 हजार 310 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग


पुणे शहरासह जिल्हा आज पावसाचा रेड अलर्ट 


काल संध्याकाळपासून खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग मुठा नदीपात्रात सुरू 


नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा 


गरज पडल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार प्रशासनाची माहिती

म्हाडाच्या पुनर्चित इमारतीमधील रहिवाशांचा म्हाडा मुख्यालयावर 28 ऑगस्टला मोर्चा

मुंबई : म्हाडाच्या पुनर्चित इमारतीमधील रहिवाशांचा म्हाडा मुख्यालयावर २८ आॅगस्ट रोजी काढणार धडक मोर्चा


या म्हाडाच्या ३८८ इमारतीत २७ हजार कुटुंब वास्तव्यास आहेत


म्हाडाच्या ३८८ इमारतींमधील रहिवाशाच्या घराच्या पुनर्विकासाच्या न्याय हक्कासाठी रहिवाशी काढणार मोर्चा


म्हाडा प्रशासनाने पाठ पुरावा करून नगर विकास खाते व सरकारकडून विनियम ३३(२४) काढलच पाहिजे


पुर्नविकासात अडथळा आणणारी २० टक्के प्रिमियमची जाचक अट विनीयम ३३(१०) प्रमाणे शिथील करावी.


तोकड्या जागे अभावी रखडलेल्या इमारतींचा पुर्नविकास प्राप्त उपकर प्राप्त इमारतींसोबत एकत्रित पुर्नविकासासाठी घ्यावा


तसेच वारसा हक्काने गाळे हस्तांतर प्रक्रियेत सक्सेशन सर्टिफिकिटची जाचक व खर्चिक अट रद्द करून पूर्वी प्रमाणे क्षतपूर्ती बंध प्रक्रिया सुरू करावी अशी मोर्चेकरांची मागणी

धक्कादायक! मनमाडमध्ये साडेतीन वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

नाशिक ब्रेकिंग...


- मनमाडमध्ये साडेतीन वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार...


- १९ वर्षीय संशयित तरुणाला अटक.


- पोक्सो कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल ..

मालेगावमधील गिरणा धरणातील पाणीसाठ्यात वाढ

मालेगाव ( नाशिक ) : ब्रेकिंग...


- गिरणा धरणातील पाणीसाठ्यात वाढ..


- धरणात ५०.६५ टक्के पाणीसाठा...


- मागील १५ दिवसांपूर्वी धरणात होता अवघा १५ टक्के पाणीसाठा...


- चणकापूर, हरणबारी धरण भरल्याने गिरणा नदीत पाण्याचा  विसर्ग सुरू..

Maharashtra Rain Update : महाबळेश्वर कोयना परिसरात पुन्हा पावसाचा जोर, कोयना धरणात पुन्हा पाण्याची आवक वाढली

महाबळेश्वर कोयना परिसरात पुन्हा पावसाचा जोर


गेल्या 24 तासात महाबळेश्वरात 110 मिलिमीटर तर


कोयना परिसरात 95 मिलिमीटर पावसाची नोंद


कोयना धरणात पुन्हा पाण्याची आवक वाढली


पुन्हा दरवाजे उघडले जाण्याची  शक्यता

पार्श्वभूमी

मुंबई : सध्या राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन झाले आहे. मराठवाड्यातही पावसाच्या सरी बसरत आहेत. मुंबई आज सकाळापासूनच पावासाला सुरुवात झाली आहे. तर दुसरकीडे राजकीय वर्तुळातही अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. बदलापूरमधील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय. या तसेच राज्य, देश, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.