Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स, वाचा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Live Updates: राज्यासह देशात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडत आहेत.

मुकेश चव्हाण Last Updated: 22 Jan 2025 10:50 AM
पंढरपुरात वाल्मिक कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी 

संतोष देशमुख हत्याप्रकरणी वादात सापडलेल्या वाल्मिक कराड याच्याबाबतीत सरकार कठोर भूमिका घेत नसल्याचा सर्वत्र संतापाचे वातावरण असताना पंढरपुरातील काही तरुणांनी वाल्मिक कराड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देऊन आपला संताप व्यक्त केला.  पंढरपुरातील मराठा समाजाचे नेते बापु शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे व्यायाम शाळेसमोर बीड जिल्ह्यातील खंडणीच्या गुन्ह्यातील अटक केलेला आरोपी वाल्मिक कराड याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली.

कारने बाळासह मावशीला उडवले, पिंपरी चिंचवडच्या सोसायटीतील अपघात सीसीटीव्हीत कैद

पिंपरी चिंचवडच्या सोसायटीत कारने बाळासह मावशीला उडवलंय. हा भीषण अपघातात सीसीटीव्हीत ही कैद झालाय. यात मुलाचा पाय फ्रॅक्चर झालाय तर मावशीला सुद्धा चांगलाच मार लागलाय. मोशीच्या प्रिस्टीन ग्रीन सोसायटीत हा अपघात 16 जानेवारीला झालाय, पण अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल नाही. 

सिंदखेड राजा येथील स्नेहल ज्वेलर्स वरील दरोड्यातील चौघांना बेड्या

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे 12 ऑगस्ट 2024 रोजी स्नेहल ज्वेलर्स वर रात्रीच्या सुमारास भिंतीला भगदाड पाडून दरोडा टाकण्यात आला होता यात मोठ्या प्रमाणात सोने व चांदीची लूट दरोडेखोरांनी केली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार दरोडेखोरांना अटक केली असून त्यांच्याकडून 22 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या दरोडेखोरांकडून अजूनही काही ठिकाणी दरोडे टाकण्यात आल्याची माहिती आहे.

खेळताना शेकोटीत पडलेल्या ८ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

घरासमोर पेटवलेल्या शेकोटीमध्ये पडून गंभीररीत्या भाजल्या गेलेल्या देवांशू सुनील सोनवणे या 8 महिन्यांच्या बालकाचा 20 रोजी उपचारादरम्यान  मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना तालुक्यातील नांद्रा खुर्द येथे घडली. 

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचा नवीन जिल्ह्याच्या निर्मीतीच्या चर्चेला पूर्णविराम

अनेक दिवसांपासून राज्यात नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र नवीन जिल्हा निर्मितीसाठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च येतो तसच अनेक प्रस्तावित नवीन जिल्ह्यांच्या ठिकाणी पायाभूत सुविधाच अद्यापही तयार नसल्याने नवीन जिल्ह्यांची निर्मिती सध्या तरी होणार नसल्याचे सुतोवाच कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केल आहे. त्यामुळे नवीन जिल्ह्यांच्या चर्चेला सद्यस्थितीत तरी पूर्णविराम मिळाला आहे.

माणगाव दिघी भागात औद्योगिक प्रकल्प उभारले जाणार

केंद्र व राज्य सरकारच्या उद्योग विभाग मार्फत औद्योगिक वसाहत प्रकल्प उभारला जातोय, हा प्रकल्प 4 हजार एकर वर सुमारे 1 हजार 865 कोटी रुपये खर्च करून उभारला जातोय. या प्रकल्पात 1 हजार हेक्टर वर बल्क ड्रग पार्क तर 61 हेक्टर वर चर्मोद्योग समूह उभा राहतोय, यामुळे 3 लाख रोजगार निर्मिती होत असून या कामांना फेब्रुवारी पासून सुरवात होतेय.

विषबाधा करून भटक्या कुत्र्यांची हत्या केल्याच्या प्राणी मित्र संघटनेचा आरोप 

मुंबईच्या विलेपार्ले पश्चिमेकडील कूपर रुग्णालयाच्या आवारात 4 भटक्या कुत्र्यांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना आली समोर 


विषबाधा करून भटक्या कुत्र्यांची हत्या केल्याच्या प्राणी मित्र संघटनेचा आरोप 


कूपर रुग्णालय प्रशासन आणि प्राणी मित्र संघटनेने केली जुहू पोलीस ठाण्यात तक्रार


याप्रकरणी जुहू पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला केली सुरुवात


जुहू पोलिसांनी कूपर रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन केली तपासाला सुरुवात 


याच सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून आरोपीचे शोध देखील पोलीस घेत आहे...

राज्यात दावोसमधून रेकाॅर्ड ब्रेक गुंतवणूक 

राज्यात दावोसमधून रेकाॅर्ड ब्रेक गुंतवणूक 


राज्य सरकारकडून दावोसमध्ये कंपन्यांसोबत ३१ सामंजस्य करार 


जवळपास ६.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्यास यश 


टाटा ग्रुपसोबत ३० हजार कोटींचा सामांजस्य करार 


सिएटकडून ५०० कोटींची गुंतवणूक होणार ज्यामुळे जवळपास ५०० जणांसाठी रोजगार निर्मिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे येथील स्मारकाबाबत आज महत्त्वपूर्ण बैठक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे येथील स्मारकाबाबत आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक


महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार


सार्वजनिक बांधकाम मंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्यायमंत्र्यांसह या तीनही विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव उपस्थित राहणार 


सकाळी 11 वाजता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात बैठक 


स्मारकासंदर्भातील महत्वपूर्ण निर्णय होणार असल्याची माहिती

आज वाल्मिक कराडला न्यायालयात व्हीसीद्वारे करणार हजर

वाल्मिक कराड याची सात दिवसांची सीआयडी कोठडी आज संपत आहे. साधारण अकरा वाजता बीडच्या विशेष जिल्हा न्यायालयात कराडला हजर केले जाईल. सुरक्षेच्या दृष्टीने ही सुनावणी व्हीसीद्वारे होण्याची शक्यता आहे. खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर कराडला देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीने ताब्यात घेतले. यादरम्यान सात दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली होती. ही कोठडी आज पूर्ण होत असून न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे कराडला पुन्हा सीआयडी कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी यावर निर्णय होणार आहे.

दिल्लीत चार दिवस बंद राहणार मदिरागृहे 

दिल्ली सरकारने 3 ते 5 फेब्रुवारी, मतदानाच्या दिवशी आणि 8 फेब्रुवारीला निकाल जाहीर होईपर्यंत राजधानीत दारूची दुकाने आणि मद्य सेवा देणारी इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली उत्पादन शुल्क आयुक्तांनी नुकत्याच जारी केलेल्या अधिसूचनेत, विविध अबकारी परवान्यांसाठी उत्पादन शुल्क नियम-2010 अंतर्गत मतदानाचा दिवस आणि मतमोजणीचा दिवस कोरडा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे.  

ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर चार देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर आज चार देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली.  भारताकडून परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यात सहभागी झाले होते.  अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ हे देखील या बैठकीला उपस्थित होते.  या दोन प्रमुख नेत्यांशिवाय जपान आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्रीही या बैठकीला उपस्थित होते.  ताकेशी इवाया यांनी जपानचे प्रतिनिधित्व केले, तर ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांनी आपापल्या देशांचे प्रतिनिधित्व केले.  

उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी 7 वाजताच मंत्रालयात दाखल 

उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी 7 वाजताच मंत्रालयात दाखल 


अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमींवर अजित पवारांकडून विविध खात्यांच्या मंत्र्यांसोबत निधी बाबत आढावा बैठक सुरू 


मंगळवारी देखील सकाळी साडे आठ पासून अजित पवारांनी विविध खात्यांचा आढावा घेतला 


कृषी, पर्यटन, ओबीसी मंत्रालय, दुग्धविकास, ग्रामपंचायत, अल्पसंख्यांक विभागाचा आढावा घेतला होता

मोतोश्रीच्या अंगणात शिंदेची - ठाकरेंची बॅनरबाजी

मोतोश्रीच्या अंगणात शिंदेची - ठाकरेंची बॅनरबाजी


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कलानगर मातोश्री परिसरात दोन्ही शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे


उद्या दोन्ही शिवसेनेचे मेळावे पार पडणार याच अनुषंगाने शक्ती प्रदर्शन पहायला मिळणार आहे


मातोश्री परिसरात शिंदे सेनेकडून जोरदार बॅनरबाजी


महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभुमिवर उद्या मुंबईत होणार जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न असणार आहे

नाशिकच्या पंचवटीत इमारतीमधील पार्किंगच्या वादातून मारहाण; एकाचा मृत्यू

नाशिकच्या पंचवटीत गेल्या आठवड्यात शिक्षक पत्नीच्या खुनाचा तपास सुरु असतानाच आता दुसऱ्या घटनेत साेसायटीतील पार्किंगच्या वादातून साेसायटी चेअरमनसह कुटुंबा व मुलांना केलेल्या जबर मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने बुधल विश्वकर्मा यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

पश्चिम रेल्वेवर तीन दिवस मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी रात्री ब्लॉक


माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान पूलाच्या बांधकामासाठी शुक्रवार-शनिवार आणि रविवारी रात्रकालीन ब्लॉक 


शुक्रवार-शनिवारी अप आणि डाउन धीम्या मार्गावर मध्य रात्री नऊ आणि जलद मार्गावर सात तासांचा 


तर, शनिवार-रविवार मध्यरात्री धीम्या मार्गावर नऊ आणि जलद मार्गावर दहा तासांचा ब्लॉक 


शुक्रवार-शनिवार दरम्यानच्या मध्यरात्री घेणाऱ्या ब्लॉकमुळे सुमारे १२७ लोकल फेऱ्या पूर्णतः आणि ६० अंशतः रद्द 


शनिवार रविवार दरम्यानच्या मध्यरात्री १५०  फेऱ्या रद्द

चौकशी करून पोलिस कर्मचारी दोषी आढळल्यास योग्य कारवाई करणार- नवनीत कावत

मृत महिलेला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची अफवा पसरवल्याचा आरोप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध बीडच्या पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले 


चौकशी करून पोलिस कर्मचारी दोषी आढळल्यास योग्य कारवाई करणार : नवनीत कावत


विवाहित मुलीचा मृत्यू एचआयव्हीमुळे झाल्याची अफवा पसरल्यानंतर मुलीच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले होते

टोरेस गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने नऊ परदेशी आरोपींविरोधात बजावली ब्लू कॉर्नर नोटीस

टोरेस गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने नऊ परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आहे. 


त्यात आठ युक्रेनचे व एक तुर्कस्थानचा नागरिक आहे.


 याप्रकरणातील मुख्य आरोपीने २०० कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे.


 टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी पसार झालेला तौसिफ रियाज उर्फ जॉन कार्टर याचा अद्याप पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही.


 या प्रकरणाचा गुंता सोडविण्यासाठी तौफिक सापडणे गरजेचे आहे.


 त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत असून तो कुठे दिल्यास संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे.

सैफच्या घराच्या झाडाझडतीत आरोपी शेहजादची टोपी पोलिसांना सापडली

सैफ अली खान हल्ला प्रकरणात सैफच्या घराच्या झाडाझडतीत आरोपी शेहजादची टोपी पोलिसांना सापडली


ज्या ठिकाणी सैफअली खान आणि शेहजादची झटापट झाली. त्याच सैफचा मुलगा जहांगिरच्या खोलीत ही टोपी पडलेली होती


पोलिसांनी टोपी आणि त्यातील केस डीएन विश्लेषणासाठी न्याय वैद्यक प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत


तर सैफच्या घरातून आरोपीचे १९ हातांचे बोटांचे ठसे पुरावे म्हणून पोलिसांना मिळाले आहेत

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live Updates: राज्यासह देशात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडत आहेत. बीड प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) याला आज व्हिसीद्वारे बीड जिल्हा न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. तर अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमेरिकेतही डोनाल्ड ट्रम्प महत्वाचे निर्णय घेत आहे. तर पालकमंत्रिपदावरुन राज्याचं राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. राज्यासह देशात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडत आहेत.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.