पुणे: पुण्यातील गुन्हेगारी आणि वाढते अपघात हा नेहमीच चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरतो. मात्र, सध्या सोशल मीडियावर पुण्यातील एका विचित्र अपघाताचा (Car Accident) व्हिडीओ व्हायरल होत आहे. या अपघातामध्ये एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन कार खाली कोसळली. पुण्यातील विमाननगर (Pune News) परिसरात हा प्रकार घडला. येथील शुभ अपार्टमेंट या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पार्किंगमध्ये गाडी मागे घेताना चालकाच्या चुकीमुळे कार थेट खाली कोसळली. रविवारी सकाळी 10 वाजता हा प्रकार घडला. 


पुण्यातील या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शुभ अपार्टमेंट इमारतीच्या पहिल्या मजल्याची भिंत तोडून काळ्या रंगाची होंडा सिटी कार खाली पडताना दिसत आहे. हा अपघात चालकाच्या चुकीमुळे घडल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या मजल्यावरील पार्किंगमध्ये चालकाने कार पुढे घेण्याऐवजी चुकून मागे घेतली. इमारतीच्या पार्किंगची भिंत तकलादू असल्यामुळे कारची धडक बसल्यामुळे भिंत लगेच तुटली आणि कार खाली कोसळली. पहिल्या मजल्यावरुन कोसळल्यानंतर कार उभीच राहिली. सुदैवाने कारचा वेग जास्त नसल्यामुळे मोठा अनर्थ होण्यापासून टळला. कार खाली पडल्यानंतर गाडीतील लोक बाहेर पडले. या अपघातामध्ये सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही.


पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव कारने मावशीसह बाळाला उडवलं


पिंपरी चिंचवडच्या एका सोसायटीत कारने बाळासह मावशीला उडवल्याची घटना समोर आली आहे. हा भीषण अपघातात सीसीटीव्हीत ही कैद झाला आहे. यात मुलाचा पाय फ्रॅक्चर झालाय तर मावशीला सुद्धा चांगलाच मार लागला आहे. मोशीच्या प्रिस्टीन ग्रीन सोसायटीत हा अपघात 16 जानेवारीला झाला होता. पण अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल नाही.  अपघाताची सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्य पाहिल्यावर यात कार चालकाची चूक आहे, हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची नक्कीच गरज नाही. मात्र, जखमी मुलाच्या वडिलांनी यात माझ्याच मुलाची चूक आहे, तोच गाडीच्या समोर धावत आला, असा जबाब पोलिसांना लिहून दिल्यानं, आश्चर्य व्यक्त केलं जातंय. कदाचित मुलाच्या वडिलांवर दबाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस याप्रकरणात काही कारवाई करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


VIDEO: पुण्यात कारचा अपघात



आणखी वाचा


टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात घुसल्या, नाशिकच्या द्वारका पुलावर अपघात नेमका कसा घडला?


खेळताना शेकोटीत पडलेल्या 8 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू; 10 दिवस मृत्यूशी झुंज ठरली अपयशी