Maharashtra Breaking 17th July LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra Breaking 16th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
Shirdi News : सबका मालिक एक असा संदेश देणा-या साईबाबांच्या शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह दिसून येत आहे. शिर्डी माझे पंढरपूर ही भावना घेऊन हजारो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. आषाढी एकादशी निमित्ताने साई प्रसादालयात भाविकांसाठी खास 15 टन साहित्य वापरून साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद बनवण्यात आलाय. खिचडीचा महाप्रसाद बनवण्यासाठी 7 हजार किलो साबुदाणा , 5 हजार किलो शेंगदाणे , 3 हजार किलो बटाटे , 1.5 हजार किलो तूप , मिरची असे साहित्य वापरून महाखिचडी प्रसाद बनविण्यात आला आहे.
CM Eknath Shinde : मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. काळजी करु नका याबाबत लवकरच बातमी देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सरकार कोणावरही अन्याय करणार नाही, भेदभाव करणार नाही गडकोट किल्ल्यांबाबत एक ॲक्शन प्लॅन तयार होईल असेही ते म्हणाले.
Palghar News : महाराष्ट्रात विक्रीसाठी वाहतुकीस बंदी असलेलं दादरा नगर हवेली आणि दमन बनावटीचे मद्य वाहतूक करताना पालघरमधील वाणगाव पोलिसांनी धडक कारवाई केली आहे . मिळालेल्या गुप्त माहितीवरून वानगाव पोलिसांनी चिंचणी येथे ही कारवाई केली असून या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आला आहे . या कारवाईत एका चार चाकी वाहनासह एक लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . अवैधरीत्या मद्य वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे .
Amboli Ghat News : सिंधुदुर्गमधील आंबोली घाटात भला मोठा दगड रस्त्याच्या मधोमध पडल्याने वाहतुक नसल्याने अनर्थ टळला. मात्र सध्या आंबोली घाटात वाहतुक बंद करण्यात आली असून हा दगड दरडी कोसळण्याच्या ठिकाणी पडला आहे. सध्या हा दगड हटवण्याचे काम करू असून दगड हटवल्या नंतर आंबोली घाटातील वाहतूक सुरू केली जाणार आहे.
Ashadhi Ekadashi News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमधील चित्रकार सुमन दाभोलकर यांनी आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलाचे स्टोन आर्ट साकारले आहे. दगडावर विविध प्रकारच्या रंगांची उधळण करून सुमन दाभोलकर यांनी विठ्ठलाचे आकर्षक असं स्टोन आर्ट साकरलं आहे.
Buldhana News : विदर्भाचे पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे आज आषाढी एकादशीनिमित्त भक्तांची मांदियाळी बघायला मिळत आहे. सकाळपासूनच या परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून भर पावसातही भाविकांचा उत्साह कुठेही कमी झालेला दिसत नाही. आषाढी एकादशी निमित्त संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी राज्यभरातून जवळपास एक लाख भाविक दाखल झालेले आहेत.
ED News : 263 कोटी रुपयांच्या प्राप्तिकर गैरव्यवहाराप्रकरणी ईडीकडून पुरवणी आरोपपत्र सादर
राजेश बत्रेजा, पुरूषोत्तम चव्हाण, अनिरुद्ध गांधी आणि तीन कंपन्यांविरोधात ईडीने मंगळवारी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं
आरोपी संगनमतानं भारत आणि दुबई दरम्यान हवाला रॅकेट चालवत असल्याचा आरोप
आरोपींचा गुन्ह्यात थेट समावेश असल्याचे पुरावे, विशेष न्यायाधीश ए.सी. डागा यांनी घेतली आरोपपत्राची दखल
पुरुषोत्तम चव्हाण वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे पती आहेत
ईडीनं पुरूषोत्तम चव्हाण यांच्या मुंबईतील सदनिका आणि इतर आरोपींच्या मालमत्तांसह एकूण 14 कोटींची मालमत्ता नुकतीच जप्त
याप्रकरणी आतापर्यंत 182 कोटींच्या मालमत्तेवर ईडीनं टाच आणली आहे
Nandurbar News : शहादा तालुक्यातील बामखेडा आणि वडाली परिसरातील लागवट करण्यात करण्यात आलेल्या सोयाबीन पिकावर येलो मॉजेक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून सोयाबीन पिके धोक्यात आली असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सोयाबीन पिकावर या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्याने काही शेतकऱ्यांवर संपूर्ण पीक उपटून टाकण्याची वेळ आलेली आहे .
Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील वडलापेठ येथे होणाऱ्या "सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड" या लोह पोलाद कारखान्यासाठी राज्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी तब्बल अडीचशे एकर जागा स्वतः दिल्याचा दावा केलाय.
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल विधानसभेच्या 120 पेक्षा अधिक जागांचा आढावा घेतला. महाविकास आघाडीमध्ये समसमान वाटप झाल्यास 90 ते 100 जागांवर उमेदवार देण्याची तयारी ठाकरे गटानं केलीये. मुंबई, कोकण आणि मराठवाडा या तीन विभागांमध्ये ठाकरे गटाची ताकद अधिक आहे. येथील सर्व जागांचा आढावा ठाकरेंनी आपल्या नेत्यांकडून घेतला. तसंच, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवरही चर्चा झाली. निवडणूक मविआतूनच लढण्याचा निर्णय जरी घेतला असला, तरी सर्व 288 मतदारसंघांमध्ये ताकद वाढवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून करण्यात येणार आहे. मुंबईत लवकरच मविआचा पदाधिकारी मेळावा होणार आहे, त्यानंतर जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय होणार आहे.
Ladka Bhau Yojana : लाडकी बहीण पाठोपाठ आता विद्यार्थ्यांसाठीही खास योजना
बारावी पास, डिप्लोमा, पदवीधरांसाठी दरमहा स्टायपेंडची घोषणा
बारावी पास विद्यार्थ्यांना 6 हजार, डिप्लोमाधारकांना 8 हजार, पदवीधरांना 10 हजार
Ashadhi Ekadashi 2024 : मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून नाशिकच्या साटाणामधील बाळू अहिरे यांना महापूजा करण्याचा मान मिळाला. १६ वर्षांपासून हे कुटुंब वारी करत आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी.
CM Shaskiya Mahapooja: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मोठ्या उत्साहात विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांनी बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, राज्यातील प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत असं विठुरायाचरणी साकडं घातलंय. मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांशी बातचीत केलीये कृष्णा केंडे यांनी.
Ashadhi Ekadashi 2024 : संपूर्ण राज्याचं अराध्य दैवत असलेल्या विठूरायाच्या दर्शनासाठी अवघी पंढरी नगरी दुमदुमली आहे. पंढरपूरमध्ये आज मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये आषाढी एकादशीच्या सोहळा संपन्न होत आहे. मुख्यमंत्र्याबरोबरच नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील बाळू आणि आशाबाई अहिरे दांपत्य यांना यंदा मानाचे वारकरी म्हणून महापूजेचा सन्मान मिळाला. मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब शासकीय महापूजन केलं. विठूरायाचं विधीवत पूजन करून त्याला मानाचे वस्त्र आणि तुळशीहार परिधान करण्यात आला. विठूरायाच्या दर्शनासाठी शेकडो मैल वाट तुडवत आलेल्या वारकऱ्यांना सावळे सोजिरे रूप पाहून गहिवर दाटून आला. चंद्रभागेच्या तिरी वारकऱ्यांची मांदियाळी झालीय. पाऊस चांगला झाल्यामुळे चंद्रभागेला चांगलं पाणी आहे. त्यामुळे चंद्रभागा स्नानाचा अनुभव वारकरी घेत आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking 17th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा, खासदार श्रीकांत शिंदेही सपत्नीक उपस्थित, चारही पिढ्यांपासून वारीची परंपरा
2. राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, बळीराजाच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विठुरायाकडे साकडं
3. नाशिकचे अहिरे दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी, आई-वडिलांच्या पुण्याईमुळेच विठुरायाच्या पूजेचा मान, अहिरे दाम्पत्याची एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया
4. मुंबईत प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात आषाढी वारीचा उत्साह, हजारो मुंबईकरांची विठ्ठल दर्शनाला गर्दी
5. लाडक्या बहिणीनंतर राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी खास योजना, बारावी पास केल्यावर मिळणार सहा हजार, डिप्लोमावाल्यांना आठ तर पदवीधरांना 10 हजार स्टायपेंडची घोषणा
6. खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्डद्वारे पूजा खेडेकरांनी मिळवलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र, रहिवासी म्हणून दिला थर्मोव्हेरीटा कंपनीचा पत्ता
7. वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांच प्रशिक्षण स्थगित, तातडीने मसुरीला परत जाण्याचे आदेश, एबीपी माझाच्या बातमी आणि पाठपुराव्याचा दणका
8. बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भगदाड, एबीपी माझाच्या रिअॅलिटी चेकनंतर MSRDC च्या अभियंत्यांकडून मध्यरात्रीच खड्ड्यांची पाहणी
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -