Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra Breaking 14th August 2024 Marathi News LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Aug 2024 12:42 PM
तुबची बबलेश्वरच्या माध्यमातून योजनेचे पाणी जत तालुक्यातील मोटेवाडी, आसंगी तलावात दाखल

तुबची बबलेश्वरच्या माध्यमातून योजनेचे पाणी जत तालुक्यातील मोटेवाडी आसंगी तलावात दाखल झालेय. यामुळे काही तलाव  भरणार असल्याने  जत पूर्व भागातील पाण्याची  चिंता काहीशी मिटली आहे. जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी तुबची बबलेश्वरच्या माध्यमातून जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित भागाला  पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले होते .नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार सावंत यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून जत तालुक्याला पाणी मिळणेबाबत आंदोलन केले होते. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली होती व त्यांच्या दालनात यावर बैठक घेऊन आमदार सावंत यांनी व्यथा मांडली होती. तसेच कर्नाटक राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री सध्याचे कॅबिनेट मंत्री एम बी पाटील याचीही आ. सावंत हे वेळोवेळी भेट घेऊन पाणी सोडण्यासाठी आग्रही मागणी करत होते. काही दिवसांपूर्वीच आ. सावंत यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री  सिद्धरमय्या व उप.मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचीही भेट घेऊन पाण्याची समस्या सांगून तुबची बबलेश्वर च्या माध्यमातून पाणी मिळावे हि मागणी केली होती. 

Maharashtra News : कामगारांचे कुटुंबीयांसोबत ठिय्या आंदोलन सुरू
Maharashtra News : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कारखान्याच्या मुख्य गेट समोर कामगारांनी कुटुंबीयांसोबत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. अल्ट्राटेक सिमेंट कारखान्यात लोडींग विभागाच्या कामगारांचे गेल्या आठ दिवसांपासून सुधारित मजुरी चे दर आणि अन्य सुविधांसाठी आंदोलन सुरू आहे. मात्र आंदोलन सुरू असतांना कंपनीने या लोडींग विभागाच्या 265 कामगारांना कामावर न घेता बाहेरून कामगार आणून सिमेंट ची लोडिंग सुरू केली. त्यामुळे संतप्त कामगारांनी कुटुंबियांसह ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कंपनी परिसरात सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

 
Maharashtra News : चोपड्यात 28 वर्षीय नरधामा कडून 10 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग; आरोपींवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

Maharashtra News : चोपडा शहरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांच्या ताब्यात घेत अटक केली आहे.


शहरातील 28 वर्षीय आरोपीने आदिवासी परिवारातील मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील  10 वर्षीय मुलीचा तिच्या राहत्या घरात घुसून अश्लील चाळे करत विनयभंग केल्या ची घटना घडली आहे,  या प्रकारणी पिडितेची आईच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध चोपडा शहर पोलिसात बालकांचे लैंगिक शोषण,तसेच अनुसुचित जाती जमाती अत्याचार कायदा, अंतर्गत पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस  अटक करण्यात आली आहे.आरोपी ला न्यायालयात हजर केले असता आरोपीस न्यायालयीन कोठडी मिळाली आहे पुढील तपास उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे करीत आहेत.
Maharashtra News : सोयाबीनला शेंगा लागत नसल्याने एक एकर मधील सोयाबीन शेतकऱ्यांनी उपटले

Maharashtra News : हिंगोलीच्या कारेगाव परिसरातील शेतकरयाने आपल्या एक एकर शेतीमधील सोयाबीन उपटून फेकून दिले आहे,बद्री गीते असे या शेतकऱ्याचे नाव असून शेतीमध्ये सोयाबीन बियाणाची लागवड करूनही सोयाबीनला शेंगा लागत नसल्याने, बोगस बियाणे निघाल्याने या शेतकऱ्याने आपल्या एक एकर शेतीमधील संपूर्ण सोयाबीन उपटून फेकत जनावरांना चारला आहे, कृषी विभागाने बोगस बियाण्याची चौकशी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

Akola News : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे चारधाम यात्रेसाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला

Akola News : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा  येथल्या चारधाम यात्रेसाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला. श्रीनगर येथे ट्रक आणि कारच्या अपघातात तिघेजण ठार. मृतांमध्ये दोन महिलांसह एका पुरूष भाविकांचा समावेश. अमरनाथचं दर्शन करून श्रीनगरमध्ये आल्यावर झाला अपघात. अपघातात तेल्हारा शहरातील भैय्या किराणावाले यांच्या घरातील दोन महिला. चार जण जखमी झाल्याची माहिती. जखमींवर श्रीनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking 14th August 2024 Marathi News LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


1. हिट अँड रननं पुन्हा मुंबई हादरली; वर्सोवा बीचवर झोपलेल्या रिक्षाचालकावर गाडी घातली, आरोपींना नागपुरातून अटक


2. Independence Day 2024 : एकत्रच मिळाले स्वातंत्र्य, तरीही पाकिस्तान भारताच्या एक दिवस आधी का साजरा करतो स्वातंत्र्यदिन? कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल


3. Chitra Wagh: माझ्या मुलींना सासरी त्रास होतो; संजय राठोडांविरोधातील चित्रा वाघ यांच्या याचिकेवर वडिलांचा मध्यस्थी अर्ज

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.