Maharashtra News Live Updates:राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 80 महत्त्वाचे निर्णय, ओबीसी नॉन क्रिमीलेयरचा उत्पन्न टप्पा 15 लाखांपर्यंत

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

ज्योती देवरे Last Updated: 10 Oct 2024 02:24 PM
Solapur - सोलापूरच्या मोहोळ मतदारसंघातील आमदारांनी लावलेल्या विकास कामाच्या बॅनरवर काळे फासले

Solapur - सोलापूरच्या मोहोळ मतदारसंघातील आमदारांनी लावलेल्या विकास कामाच्या बॅनरवर काळे फासले


- मोहोळ तालुक्यातील अंकोली बाबळगाव येथे मंजूर झालेल्या विकास कामाच्या बोर्डावर काळी शाई टाकून निषेध व्यक्त केला 


शरद पवार गटाचे कार्यकर्ते बाबाराजे पाटील याने बॅनरवर काळे फेकल्याची माहिती.

Gondia : रतन टाटा यांच्या निधनामुळे शासकीय दुखवटा, गोंदिया येथे आयोजित महिला मेळावा रद्द, 5000 महिला आल्या पावली परतल्या

Gondia : रतन टाटा यांच्या निधनामुळे शासकीय दुखवटा, गोंदिया येथे आयोजित महिला मेळावा रद्द, 5000 महिला आल्या पावली परतल्या


शासकीय दुखवटा असल्याने मेळावा रद्द.... मेळाव्याला आलेल्या 5000 महिला आल्या पावली परतल्या.... 


 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' तथा महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन आज गोंदिया शहरातील मोदी मैदान येथे करण्यात आले होते.


मात्र ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला.


त्यामुळे हा महिला मेळावा रद्द करण्यात आला.


यावेळी महिला मेळाव्याच्या ठिकाणी उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिण्यात आली. तर या मेळाव्याला जवळपास 5 हजार महिला उपस्थित होत्या.


मेळावा रद्द झाल्याने महिलांना आल्या पावली परत जावं लागलं....

Pune : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील तात्काळ जामीन देणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाचे दोन सदस्य बडतर्फ

Pune : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील तात्काळ जामीन देणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाच्या दोन सदस्यांना बडतर्फ करण्यात आलंय


एल . एन. धनवडे आणि कविता थोरात अशी या दोन सदस्यांची नावे आहेत.


१९ मे च्या मध्यरात्री पुण्यातील कल्याणी नगरमधे दारुच्या नशेत पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलीसांनी अटक करुन बाल हक्क न्याय मंडळासमोर हजर केले होते.


मात्र एल. एन. धनवडे आणि कविता थोरात यांनी तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन त्या अल्पवयीन आरोपीची जामिनावर सुटका केली होती.


त्यानंतर महिला आणि बालकल्याण विभागाकडून या दोघांची चौकशी करण्यात आली


त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला होता.


चौकशीत दोषी आढळल्यानंतर आता या दोघांना बाल हक्क न्याय मंडळावरून बडतर्फ करण्यात आलंय.

Raigad : लाडक्या बहिणींची बँकेत पुन्हा उसळली गर्दी, महिलांची पैसे काढण्यासाठी झुंबड 

Raigad : लाडक्या बहिणींची बँकेत पुन्हा उसळली गर्दी


जिल्हयात ठिकठिकाणी बँक पोस्ट कार्यालयात महिलांची पैसे काढण्यासाठी झुंबड 


मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा वचनपूर्ती सोहळा काल रायगडच्या माणगाव मध्ये पार पडला


यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या टप्प्यातील या योजनेच एक बटनच्या क्लिक द्वारे वितरण केलं


त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात झाली..


आज रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी हे पैसे काढण्यासाठी महिलांनी बँक.. पोस्ट कार्यालयात गर्दी केलेली पहायला मिळतं आहे.

Ratan Tata Death: रतन टाटा देशाचे रतन होतेच, त्यामुळे देश त्यांना टाटा कधीच करणार नाही - शायना एन सी, भाजप प्रवक्त्या

Ratan Tata Death: रतन टाटा देशाचे रतन होतेच, त्यामुळे देश त्यांना टाटा कधीच करणार नाही - शायना एन सी, भाजप प्रवक्त्या


सिम्प्लिसिटी, जेनराॅसिटी आणि कम्पॅशन याचा विचार करत ते जीवन जगलेत 


प्राण्यांप्रती त्यांचे खूप प्रेम होते, कॅन्सरसाठी रुग्णालय त्यांनी उभारलं 


अनेक उद्योगपती नफा तोट्याचा विचार करतात 


मात्र, रतन टाटा हे समाजाला आपण काही देणं लागतो याचा विचार देखील ते करायचे

Ratan Tata Death: बार्शी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी रतन टाटा यांना अनोख्या पद्धतीने वाहिली श्रद्धांजली 

Ratan Tata Death: बार्शी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी रतन टाटा यांना अनोख्या पद्धतीने वाहिली श्रद्धांजली 


बार्शी तालुक्यातील मळेगाव मधील कर्मवीर गडसिंग गुरुजी विद्यालयाने रतन टाटा यांच्या नावाची कलाकृती सकारून वाहिली श्रद्धांजली 


चित्रकार महेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली आहे जिवंत कलाकृती 


रतन टाटा यांच्या जाण्याने विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे हळहळ 


जवळपास 200 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मिळून साकारलीय कलाकृती

Maharashtra : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की

Maharashtra : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की


धनगर ऐवजी धनगड असं वाचावे असं काढण्यात आले होते शुद्धीपत्रक


धनगड हे आपल्या राज्यातच नाहीयत,अशी भूमिका धनगर समाजाची आहे. त्यामुळं धनगर समाजाने या शुद्धीपत्रकावर आक्षेप घेतला होता.


धनगड जातीचे सात दाखले संभाजीनगरात काढले होते.ते जात पडताळणी समितीने रद्द केलेत


महसूल व सामान्य प्रशासन विभागाने काढले होते शुद्धीपत्रक


चुकीचे शुद्धीपत्रक काढणा-यांवर धनगर समाजाची मागणी

Ratan Tata Passed Away: रतन टाटा यांना भारतरत्न द्या.. राज्य मंत्रिमंडळाचा केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव

Ratan Tata Passed Away : राज्य मंत्रिमंडळाची ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव


रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव


ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला.


यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.

Jayant Patil on Ratan Tata : भारताच्या औद्योगिक पर्वात रतन टाटा हा लखलखणारा तारा होता - जयंत पाटील


Jayant Patil on Ratan Tata : भारताच्या औद्योगिक पर्वात रतन टाटा हा लखलखणारा तारा होता - जयंत पाटील


मला त्यांना भेटण्याची अनेकदा संधी मिळाली. मनाने अतिशय दिलदार.


नव्या प्रयोगाला पाहण्याची मोठी करण्याची त्यांची वृत्ती मी पाहीली.


योग्य आण् सनदशीर मार्गाने व्यापार कसा करावा हे त्यांच्या कडून कळते. 

Ratan Tata: उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू, विद्युत दाहवाहिनीवर होतील अंत्यसंस्कार

Ratan Tata: उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू


ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर वरळी या ठिकाणी अंत्यसंस्कार व्हावेत अशी सूचना टाटा कुटुंबीयांतर्फे करण्यात आली होती


त्या दृष्टीने आता तयारीचा आढावा घेण्यात आला


मोजक्या अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार होतील


त्या दृष्टीने या ठिकाणी पिण्याचे पाणी स्वच्छतागृह याचा आढावा घेतला आहे


विद्युत दाहवाहिनीवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील

Supriya Sule On Ratan Tata: रतन टाटा यांच्या जाण्यानं मोठी हानी ‌झालीय - सुप्रिया सुळे

Supriya Sule On Ratan Tata : रतन टाटा यांच्या जाण्यानं मोठी हानी ‌झालीय - सुप्रिया सुळे
माझे सासरे यांचेही टाटा यांच्याशी कौटुंबिक संबंध होते - सुप्रिया सुळे
अनेक आठवणी त्यांच्या आहेत - सुप्रिया सुळे
मी विमानात त्यांच्याबरोबर प्रवास केलाय - सुप्रिया सुळे
मला त्यांचा साधेपणा कायम जाणवला आहे - सुप्रिया सुळे


 

Ratan Tata : अमित शाह रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी NCPA पोहचणार

Ratan Tata : अमित शाह रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी NCPA पोहचणार,


 ते सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये थांबतील


रतन टाटांची अंत्ययात्रा सुरू होईल, तेव्हा अमित शाह देखील सामील होतील जाईल.

Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच मंत्री धनंजय मुंडे राहणार उपस्थित..

Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच मंत्री धनंजय मुंडे राहणार उपस्थित..


मुंडे कुटुंबातून विभक्त झाल्यानंतर भगवान गडावरील दसरा मेळाव्यातून धनंजय मुंडे यांना मुंडे समर्थकाने हाकलून लावले होते.


आता मात्र पंकजा मुंडे यांच्या सोबतच धनंजय मुंडे हे सावरगावच्या दसरा मेळाव्यात पहिल्यांदा पाहायला मिळतील

Ratan Tata : उद्यमशीलतेचं दर्शन घडवत रतन टाटांना पिंपरीतील कामगारांकडून आदरांजली.

Ratan Tata : उद्यमशीलतेचं दर्शन घडवत रतन टाटांना पिंपरीतील कामगारांकडून आदरांजली.


रतन टाटांना आदरांजली वाहण्यासाठी पिंपरीतील कामगारांनी आपलं काम अविरतपणे सुरु ठेवलं आहे. आपला देवमाणूस गेल्याचं दुःख त्यांना आहे. त्यामुळंच कामगारांना अश्रू ही अनावर होतायेत. पण त्यांचे विचार जीवंत ठेवायचे. हा उद्देश या कामगारांनी ठेवला आहे. म्हणूनचं टाटांच्या निधनानंतर उद्यमशीलता या गुणाचं दर्शन घडवत हे कामगार आपल्या कामातून त्यांना आदरांजली वाहतायेत.

Sanjay Raut - रतन टाटा उद्योगपती नव्हते हे या देशाचे आधारस्तंभ आहेत - संजय राऊत

Sanjay Raut - रतन टाटा उद्योगपती नव्हते हे या देशाचे आधारस्तंभ आहेत - संजय राऊत


-देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून देशाचा औद्योगिक विकास देशाला मिळालेला रोजगार देशाला मिळालेली प्रतिष्ठा या सर्वांमागे टाटांचं योगदान आहे 


-टाटा आहे असे व्यक्तिमत्व आहे की ते घराघरा मध्ये बसले आहे 


-देश हळ हळत आहे त्याचं कारण असं आहे की टाटाने आपल्याला भरपूर दिले आहे 


-उद्योगपतींना प्रॉफिट आणि लॉस हेच माहित आहे टाटा हे कमालीचे देशभक्त आहेत 


-देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं योगदान आहे सामाजिक लढ्यात त्यांचे योगदान आहे मुंबईसारखं शहर घडवण्यात देखील त्यांचे योगदान आहे याची इतिहासाला नोंद घ्यावी लागणार 


-ते असे उद्योगपती होते की त्यांच्यासाठी देश हे लुटण्यासाठी साधन नव्हते 

Maharashtra : राज्यातील 314 गृहनिर्माण प्रकल्पांवर नादारी दिवाळखोरीची टांगती तलवार

Maharashtra : राज्यातील 314 गृहनिर्माण प्रकल्पांवर नादारी दिवाळखोरीची टांगती तलवार


हे प्रकल्प आढळले महारेराला राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या (NCLT) संकेतस्थळावर 


यात सुरू असलेले (On going) 56 , व्यापगत ( Lapsed)194 प्रकल्प तर पूर्ण झालेले 64 प्रकल्प  


या यादीत मुंबई महानगरातील 236, पुण्यातील 52, हवेलीतील 9, अहमदनगर आणि सोलापूर प्रत्येकी 5, नाशिक  3, नागपूर 2, रत्नागिरी आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रत्येकी एकेक प्रकल्पाचा समावेश 


गुंतवणूकदारांची फसवणूक होऊ नये यासाठी महारेराने  ही यादी प्रसिद्ध केली  संकेतस्थळावर

Nagpur : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजप-संघ बैठक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं विदर्भात ‘मिशन ५१’

Nagpur : नागपूर भाजप संघ बैठक - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं विदर्भात ‘मिशन ५१’


- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजप आणि संघाच्या विविध संघटनांची थोड्याच वेळात समन्वय बैठक


- कॅाग्रेसच्या खोट्या नॅरेटीव्हला चोख उत्तर देण्यासाठी संघ आणि भाजप आखणार रणनिती


- संघाचे सह सरकार्यवाह अतुल लिमये यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक 


- विधानसभा निवडणूकीत अतुल लिमये यांच्यावर संघ आणि भाजपमध्ये समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी 


- संघाच्या समाजाशी निगडीत असलेल्या सामाजिक समरसता मंच, सामाजिक सद्भावना मंच, स्वदेशी जागरण मंच इत्यादी गतीवीघींच्या प्रमुखांची बैठक


- विदर्भातील ११ जिल्ह्यातील संघ आणि भाजपचे पदाधिकारी बैठकीत उपस्थित असणार 


- संधाचा विदर्भातील ६२ पैकी ५१ जागांवर संघाचं फोकस

Sanjay Raut : लाडकी बहिण योजनेबद्दल खोटी माहिती पसरवणं संजय राऊतांना भोवलं, गुन्हा दाखल

Sanjay Raut : लाडकी बहिण योजनेबद्दल खोटी माहिती पसरवणं संजय राऊतांना भोवलं


संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल


खोटी अफवा पसरवल्याबद्दल संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल


मध्य प्रदेशातील लाडकी बहिण योजना बंद पडल्याचा खोटा दावा राऊतांनी केला होता


भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाच्या तक्रारीनंतर संजय राऊत विरोधात गुन्हा

Ratan Tata Death : सचिन तेंडूलकर यांची रतन टाटांना अनोखी श्रद्धांजली

Political : दापोली मध्ये कुणबी भवनाच्या जागेवरून महायुतीचे दोन नेते आमने सामने...

Political : दापोली मध्ये कुणबी भवनाच्या जागेवरून महायुतीचे दोन नेते आमने सामने...


शिवसेनेचे आमदार योगेश कदम आणि भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून एकाच दिवशी दोन वेग वेगळ्या ठिकाणी कुणबी भवनाच्या जागेचे भूमिपूजन.


कुणबी समाजोन्नती संघ मुंबई आणि ग्रामीण अशा दोन कुणबी समाजोन्नती संघांना कुणबी भवनासाठी  दोन्ही नेत्यांकडून वेगवेगळे भूखंड.



कुणबी समाजोन्नती ग्रामीण सांघाच्या भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेत उबाठा गटाचे माजी आमदार संजय कदम यांचे नाव  तर विद्यमान आमदार योगेश कदम आणि रामदास कदम यांचे नाव वगळले.

Ratan Tata Death : रतन टाटा यांचे निधन, पंतप्रधान मोदी यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली

Ratan Tata Death : रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर

Pune : पुण्याच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी सुहास मापारी; आधी केलंय पुणे मनपामध्ये उपायुक्तपदी काम

Pune : पुण्याच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी सुहास मापारी; आधी केलंय पुणे मनपामध्ये उपायुक्तपदी काम


शहरात परतीच्या सरींमुळे ऑक्टोबर हिटपासून काहीसा दिलासा, १५ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज


पेसै क्षेत्रातील ३६५ कृषीसेवकांना नियुक्ती, वर्षभरापुर्वी घेतली होती परिक्षा


पुणे मंडळाकडून आज म्हाडाच्या ६ हजार घरांसाठी सोडत, मार्चमध्ये झालेल्या सोडतीतकेवळ ७६ घरांचीच विक्री


पालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सणापुर्वी मिळणार बोनस, सोनुग्रह अनुदान

Ratan Tata Death : आज सर्व शासकीय बैठका रद्द, मात्र एसटी महामंडळाची संचालक सभा पार पडणार

Ratan Tata Death : आज सर्व शासकीय बैठका रद्द. मात्र एसटी महामंडळाची संचालक सभा पार पडणार


मुख्यमंत्र्यांकडे एसटी महामंडळाचा पदभार असताना सहा महिने संचालक सभा पार पडली नव्हती मात्र भरत गोगावले अध्यक्ष होताच १० दिवसांत दुसऱ्यांदा संचालक मंडळाची सभा पार पडत आहे


१ तारखेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तब्बल ७७ विषयांना मंजुरी देण्यात आली तरी देखील १० दिवसांत दुसऱ्यांदा सभा पार पडणार


आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत करार पध्दतीने महाव्यवस्थापक पदावर माधव काळेंची नेमणूक होण्याची दाट शक्यता


सूत्रांची माहिती

Bhandara : भंडाऱ्यात आरटीओच्या वाहनाच्या धडकेत अडीच वर्षीय बालकाचा मृत्यू

Bhandara : भंडाऱ्यात आरटीओच्या वाहनाच्या धडकेत अडीच वर्षीय बालकाचा मृत्यू


राष्ट्रीय महामार्गावरील खरबी येथील घटना


जवाहरनगर पोलिसात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Ratan Tata Death: उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर

Ratan Tata Death : ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० ऑक्टोबर) एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे.


रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.


रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.