Political News : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या मुलाने भाजपला घरचा आहेर दिलाय. पंतप्रधान मोदींसोबत (PM Narendra Modi) वडिल माधव भंडारी (Madhav Bhandari) यांचा फोटो ट्विट करत राज्यात काही न मिळालेल्या नेत्यांपैकी एक असल्याची व्यक्त खंत केली आहे. चिन्मय भंडारी (Chinmay Bhandari) यांनी ट्विटमध्ये वडिलांच्या निस्वार्थी स्वभावाचा, त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि गेल्या 50 वर्षात संघटना राज्यात पोहचवण्यात केलेल्या मोलाच्या कार्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी नेहमी स्वतःपेक्षा पक्ष आणि जनता यांना महत्त्व दिलं, त्यामुळे त्यांना राजकीय वर्तुळात मानाचं स्थान आहे. असं असलं तरी राज्यातील काही न मिळालेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत जे दुर्दैवी असल्याचं सांगत ट्विट केलं आहे.
एक आशा आणि दुःख तर सारखं होतंच...
चिन्मय भंडारी म्हणाले, "आत्तापर्यंत 12 वेळा मी त्यांच्या नावाची चर्चा विधानसभा किंवा विधान परिषदेसाठी होताना पहिली आहे, 12 वेळा त्यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही. नेतृत्वाला याचा जाब अथवा त्यावर भाष्य करण्याच्या परिस्थिती मी नाही. ना मला तसे काही करायचे आहे, कारण माझ्या वडिलांसारखा माझा देखील त्यांच्यावर विश्वास आहे. पण एक आशा आणि दुःख तर सारखं होतंच. त्यांनी कधीही जाहीरपणे आपली व्यथा मांडली नाही. ज्या पक्षाच्या उभारणीसाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले तिला दुखावण्याचा प्रयत्न त्यांनी कधी केला नाही. त्यांनी पक्षाचे काम कधीच थांबवले नाही, त्यांची तब्येत बिघडली असताना देखील नाही, गेल्या वर्षी त्यांच्या जवळची व्यक्ती गमावली तेव्हाही नाही. याउलट, मी अनेक वेळा मंत्री किंवा खासदार राहिलेल्या लोकांना शुल्लक कारणावरून अन्यायाच रडगाणं गाताना बघितल आहे. माझ्या देखत बघितलेली त्यांची 30 वर्षांची कारकीर्द आत्ता शेवटच्या टप्प्यात आहे. त्यांना योग्य ते मिळेल अशी मी आशा करतो". असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय
'दुर्दैवाने त्यांना कायमच केलेल्या कामाचं अत्यंत कमी फळ मिळालं"
चिन्मय भंडारींनी पोस्टमध्ये दुर्दैवाने माझ्या वडीलांना कायमच केलेल्या कामाचं अत्यंत कमी फळ मिळालं असं म्हटंलय, ते पुढे म्हणाले, ;पक्षासाठी, जनतेसाठी काम करत असताना ते नेहमीच प्रसिद्धीच्या वलयापासून लांब राहिले. त्यांनी कधीच त्यांच्या पदाचा वैयक्तिक लाभासाठी गैरवापर केला नाही. पण दुर्दैवाने त्यांना कायमच केलेल्या कामाचं अत्यंत कमी फळ मिळालं”, असा मुद्दा या पोस्टमध्ये उपस्थित करण्यात आला आहे.