मुंबई: मिशन 45 हे लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) महायुतीने नजरेसमोर ठेवलेलं लक्ष्य. आता हेच लक्ष्य पूर्ण करण्यासाठीसाठी भाजपने (BJP) आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जिकलेल्या 23 जागांवर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसतंय. आपल्या हक्काच्या जिंकलेल्या 23 जागा पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपने निवडणूक निरीक्षकाची नेमणूक केली आहे. विशेष म्हणजे या निवडणूक निरीक्षकामध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

कोणत्या नेत्याकडे कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी? 

  • भिवंडी- योगेश सागर, गणेश नाईक
  • धुळे- श्रीकांत भारतीय, राम शिंदे
  • नंदरुबार- संजय भेगडे, अशोक उके
  • जळगाव- प्रविण दरेकर, राहुल आहेर
  • रावेर- हंसराज अहिर, संजय कुटे
  • अहमदनगर- रविंद्र चव्हाण, देवयानी फरांदे
  • जालना- चैनसुख संचेती, राणा जगजीतसिंह
  • नांदेड- जयकुमार रावल, सुभाष देशमुख
  • बीड- सुधीर मुनगंटीवार, माधवी नाईक
  • लातूर- अतुल सावे, सचिन कल्याणशेट्टी
  • सोलापूर- मुरलीधर मोहोळ, सुधीर गाडगीळ
  • माढा- भागवत कराड, प्रसाद लाड
  • सांगली- मेधा कुलकर्णी, हर्षवर्धन पाटील
  • नागपूर- मनोज कोटक, अमर साबळे
  • भंडारा-गोंदिया- प्रविण दाटके, चित्रा वाघ
  • गडचिरोली- अनिल बोंडे, रणजीत पाटील
  • वर्धा- रणधीर सावरकर, विक्रांत पाटील
  • अकोला- संभाजी पाटील, विजय चौधरी
  • दिंडोरी- राधाकृष्ण विखे पाटील, संजय कानेकर
  • उत्तर मुंबई- पंकजा मुंडे, संजय केळकर
  • उत्तर-पूर्व मुंबई- गिरीश महाजन, निरंजन डावखरे
  • उत्तर मध्य मुंबई- धनंजय महाडिक, राजेश पांडे

भाजपने नेमलेले हे निरीक्षक नेमकं काय भूमिका बजावणार?

  • नेमलेले निरीक्षक स्थानिक आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील.
  • त्या लोकसभा मतदारसंघात खासदाराबाबत लोकांचे मत काय आहे याचा आढावा घेतला जाईल.
  • 2019 साली निवडणूक आलेला खासदार पुन्हा निवडुन येऊ शकतो का? आणि जर नसेल तर दुसरा कोण उमेदवार देता येईल याचीही माहिती घेतली जाईल.
  • निरीक्षक त्या त्या लोकसभा मतदारसंघाची सर्व माहिती घेऊन एक रिपोर्ट तयार करतील आणि हा रिपोर्ट वरिष्ठांकडे देतील.
  • या रिपोर्ट नंतरच पुन्हा त्या खासदाराला संधी द्यायची की उमेदवार बदलायचा याचा निर्णय वरिष्ठ घेतील. 

दरम्यान भाजपने जे निरीक्षक नेमले त्यावरून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली असून, भाजप काही पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी म्हटलंय.

भाजपने लोकसभेसाठी 32 जागांची तयारी केल्याचे भाजपचे वरिष्ठ नेते सांगत आहेत. त्यातील 2019 साली जिकलेल्या 23 जागांसाठी भाजप विशेष खबरदारी घेत आहे. मिशन 45 पूर्ण करायचे असेल तर 2019 साली जिकलेल्या हक्काच्या 23 जागा हातात ठेवत इतर जागांसाठी वेगळी रणनिती भाजपची तयारी सुरू आहे. आता भाजप या 23 जागांपैकी किती खासदारांना पुन्हा संधी देतंय आणि किती खासदार बदलले जातील याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल. तूर्तास तरी निरीक्षक नेमल्याने खासदारांचा रिपोर्ट आता वरिष्ठांकडे जाणार हे मात्र नक्की.

ही बातमी वाचा :